लोणावळ्यात २०० शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू; शिळे अन्न खाल्ल्याने घटना, मेंढपाळावर संकट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 31, 2024

लोणावळ्यात २०० शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू; शिळे अन्न खाल्ल्याने घटना, मेंढपाळावर संकट

https://ift.tt/vDTrS9N
पुणे: लोणावळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल २०० झाला असल्याची घटना समोर आली आहे. मेंढपाळ लोणावळ्यातील रिकाम्या जागेवर शेळ्या आणि मेंढ्या चरत होत्या. त्यावेळी या प्राण्यांनी तिथे पडलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मेंढपाळाने आपल्या शेळ्या आणि मेंढ्या चरण्यासाठी मोकळ्या मैदानावर सोडल्या. त्या मैदानावरील शिळे अन्न या शेळ्यांनी खाल्ले. त्यानंतर त्या मेंढ्यांना त्रास होऊ लागला. तातडीने त्या ठिकाणी पशुधन अधिकारी आणि पशु वैद्यकीय अधिकारी यांना बोलवण्यात आले. डॉक्टरांनी या शेळ्या मेंढ्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र काही शेळ्या मेंढ्या उपचारापूर्वीच तर काही उपचारादरम्यान मृत्युमुखी पडल्या.हे सर्व मृत्यू पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात २०० हा अन्न विषबाधेमुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती पशुधन अधिकारी अनिल परंडवाल यांनी दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेळ्या आणि मेंढ्याचा मृत्यू झाल्याने मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे याची शेतकऱ्याला भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच लोणावळा परिसरात ही घटना अचानक घडल्याने मेंढपाळाच्या ही गोष्ट लक्षात आली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. यानंतर पशुधन अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. विषबाधेमुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले आहे, असे पशुधन अधिकारी यांनी सांगितले आहे.