
मुंबई : शेअर बाजारातून कमाई बक्कळ कमाई करण्यासाठी योग्य वेळी योग्य स्टॉकची निवड करणे आवश्यक असते. मोठ-मोठ्या कंपन्यांसह शेअर बाजारातील छोटूराम शेअर्स देखील कमाल करू शकतात. त्यामुळे काही पेनी स्टॉकवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीम आणि अनिश्चित असली तरी एक किंवा दुसरा शेअर त्याच्या गुंतवणूकदारांचे नशीब बदलतो. बाजारात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात पैसे गुंतवलेले गुंतवणूकदार श्रीमंत झाले.काही शेअर्सनी दीर्घ मुदतीत पैसा कमावला, तर काही अल्प कालावधीत मल्टीबॅगर ठरले. असाच एक शेअर म्हणजे एसजी मार्ट लिमिटेडचा शेअर ज्यामध्ये पैसे गुंतवलेले गुंतवणूकदार तीन वर्षांत करोडपती झाले.१२०००% पेक्षा जास्त परतावापवन आणि सौर ऊर्जेसह अक्षय ऊर्जेचे उत्पादन व साठवणूक करण्याच्या व्यवसायात गुंतलेली एसजी मार्ट या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना सातत्याने परतावा दिला असून शेअरने गेल्या काही दिवसात सतत अप्पर सर्किटला धडक दिली. तर SG मार्ट शेअर अल्पावधीतच आपल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आणि शेअरची किंमत केवळ तीन वर्षांत ९५ रुपयांवरून ११००० रुपयांपर्यंत वाढली. अशाप्रकारे कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना तीन वर्षांत १२ हजार टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.एक लाखावर करोडोंचा परतावाएसजी मार्ट शेअरच्या तीन वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकली तर १ जानेवारी २०२१ रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त ९४ रुपये होती, परंतु शुक्रवारी म्हणजेच १२ जानेवारी २०२४ रोजी ११,३७१ रुपयांवर बंद झाला. अशा परिस्थितीत, जर एखाद्या गुंतवणूकदाराने शेअरमध्ये तीन वर्षांपूर्वी फक्त एक लाख रुपये गुंतवले असते आणि आतापर्यंत होल्ड केले असतील, तर त्यांची गुंतवणूक आतापर्यंत १.२ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असेल. म्हणजे या काळात गुंतवणूकदार लखपतीतून करोडपती झाला असतील.सर्वकालीन उच्चांकावर उडी घेतलीSG मार्ट लिमिटेड शेअरने शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सर्वकालीन उच्चांक गाठला होता आणि कंपनीचे बाजार भांडवल ६,३४० कोटी रुपये आहे. कंपनीचा शेअरचा उच्चांक ११,३७१ रुपये असून या स्टॉकने फक्त दीर्घकाळातच नव्हे तर अल्पावधीतही गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. गेल्या सहा महिन्यांत शेअरने ४००.५६ टक्के, तर एका महिन्यात ४२.३० टक्के परतावा दिला. याशिवाय स्टॉकने गेल्या आठवड्यात पाच दिवसांपासून सतत अप्पर सर्किटला धडक दिली आहे.(Disclaimer: येथे दिलेली माहिती स्टॉकच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमचे नुकसान झाल्यास महाराष्ट्र टाइम्स जबाबदार राहणार नाही.)