अर्जुन तेंडुलकरचा चेंडू होता की वादळ, फलंदाज मैदानात आडवाच झाला पाहा व्हिडिओ... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 14, 2024

अर्जुन तेंडुलकरचा चेंडू होता की वादळ, फलंदाज मैदानात आडवाच झाला पाहा व्हिडिओ...

https://ift.tt/RwZVgl5
मुंबई : आयपीएल सुर होण्यापूर्वी अर्जुन तेंडुलकरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. कारण अर्जुन तेंडुलकरच्या एक चेंडू एवढ्या वेगाने आल्याचे पाहायला मिळाले की, चाहतेही अवाक् झाले आहेत. कारण अर्जुनच्या या चेंडूवर फलंदाज मैदानातच आडवा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुंबई इंडियन्सच्या संघाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण यामध्ये सर्वाधिक चर्चा ही रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांचीच सुरु होती. पण आता अर्जुन तेंडुलकरचे नाव चर्चेत आले आहे. अर्जुनने गेल्या हंगामात पदार्पण केले होते आणि त्यावेळी तो यशस्वी ठरला होता. त्यामुळे आता या हंगामात अर्जुन कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. पण या आयपीएलच्या हंगामापूर्वीच अर्जुन लक्षवेधी ठरत आहे तो आपल्या गोलंदाजीमुळे. या व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकर हा गोलंदाजी करताना दिसत आहे. अर्जुन यावेळी पहिला चेंडू असा टाकतो की, त्याचे कोणतेच उत्तर फलंदाजाकडे नाही. कारण अर्जुन यावेळी यॉर्कर टाकतो आणि ते खेळण्यासाठी प्रयत्न करणारा फलंदाज मैदानातच पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर अर्जुन आपला दुसरा चेंडू जेव्हा टाकतो, तो थेट क्रीझच्या जवळ पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा चेंडू पाहून फलंदाज आपला पाय काढून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरून या चेंडूची अचूकता आणि वेग आपल्याला समजू शकतो. अर्जुनचे हे दोन्ही चेंडू अचूक आणि भेदक पडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे चाहत्यांनी हा व्हिडिओ डोक्यावर घेतला आहे. अर्जुनचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आता अर्जुन या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता आता सर्व चाहत्यांना नक्कीच असणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी आता अर्जुन मैदानात चांगलाच घाम गाळत आहे. पण त्याची मैदानात कशी कामगिरी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.