लखनौ सुपर जायंट्सचा पंजाब किंग्सवर २१ धावांनी विजय, पदार्पण सामन्यात मयंक यादवचा कहर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 31, 2024

लखनौ सुपर जायंट्सचा पंजाब किंग्सवर २१ धावांनी विजय, पदार्पण सामन्यात मयंक यादवचा कहर

https://ift.tt/VLFGR8M
आयपीएल २०२४ च्या ११ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा २१ धावांनी पराभव केला. लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. लखनौचा हा हंगामातील दुसरा सामना होता. त्यांना पहिला विजय मिळाला आहे. घरच्या मैदानावर पहिला सामना खेळला आणि जिंकला. गेल्या सामन्यात लखनौचा संघ राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाला होता. पंजाब किंग्जबद्दल बोलायचे झाले तर त्याला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाबने पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि लखनौ संघाकडून पराभव पत्करावा लागला. लखनौने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौने २० षटकांत ८ गडी गमावून १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ २० षटकांत ५ गडी गमावून १७८ धावाच करू शकला. लखनौ सुपर जायंट्सची पंजाबविरुद्ध चमकदार सुरुवात झाली. क्विंटन डी कॉकने सुरुवातीपासूनच आपले हात उघडले होते. मात्र केएल राहुल केवळ १५ धावा करून बाद झाला. यानंतर क्विंटनने ३४ चेंडूंचा सामना करत आयपीएल कारकिर्दीतील २१ वे अर्धशतक झळकावले. निकोलस पूरनने मैदानात उतरताच चौकार आणि षटकार खेचले. त्याने २१ चेंडूत ४२ धावा केल्या. मात्र रबाडाने त्याचा डाव संपवला. त्यानंतर शेवटी कृणाल पांड्याने २२ चेंडूत ४३धावांची नाबाद खेळी केली. अशाप्रकारे लखनौने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १९९ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी झाली. बेअरस्टो बाद झाल्यानंतर पंजाबच्या धावगतीला ब्रेक लागला. मात्र, शिखर धवनने एक टोक धरून खेळ सुरूच ठेवला. तो ७० धावा करून बाद झाला. मयंक यादवने तीन आणि मोहसीनने दोन गडी बाद केले.