वृत्तसंस्था, पाटणाबिहारमधील लोकसभेच्या ४० जागांपैकी २६ जागा (राजद), तर नऊ जागा लढवणार आहे, असे महाविकास आघाडीने शुक्रवारी जाहीर केले. तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) तीन जागा लढवणार असून, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने ही घोषणा केली.राजदचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य मनोज कुमार झा, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह आणि सीपीआय (एमएल), सीपीआय आणि माकपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी संबोधित केले. बिहार विधानसभेतील महाविकास आघाडीचे नेते तेजस्वी यादव या पत्रकार परिषदेला संबोधित करणार होते, मात्र ते अनुपस्थित राहिले. उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असे झा म्हणाले.राजदने गया, औरंगाबाद, जमुई आणि नवादा या चारही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, याबाबत राजदच्या मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली असून, याला एकतर्फी पाऊल म्हटले आहे.जागावाटपाच्या सूत्रानुसार राजदने पूर्णियाची जागाही काँग्रेसकडून घेतली आहे. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यांनी महाविकास आघाडीची कोणतीही औपचारिक घोषणा न करता, ‘जदयू’मधून आलेल्या विमा भारती यांना अलीकडेच पूर्णियामधून पक्षाचे तिकीट दिले होते.गेल्या आठवड्यात काँग्रेसने पूर्णियाचे तीन वेळा खासदार असलेले पप्पू यादव यांचा पक्षात समावेश केला होता. यादव यांना या जागेवरून तिकीट मिळण्याची आशा होती. त्यांनी तसा दावाही केला होता की, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आपल्याला या जागेचे आश्वासन दिले होते. ओडिशात ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसला रामरामभुवनेश्वर : ओडिशातील तीन वेळा काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुरेंद्र सिंह भोई यांनी ३८ वर्षांनंतर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सत्ताधारी बिजू जनता दलात (बीजेडी) प्रवेश केला. तर दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांनीही पक्षाचा राजीनामा दिला असून, ते ‘बीजेडी’मध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या नेत्यांमध्ये निलगिरीचे आमदार सुकांत नायक आणि पक्षाचे कटक जिल्हाध्यक्ष प्रकाश चंद्र बेहरा यांचा समावेश आहे.
https://ift.tt/YSOquJC