
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई रेल्वे स्थानकांना ब्रिटिशांनी दिलेली नावे आता इतिहासजमा होणार आहेत. मुंबई उपनगर रेल्वेवरील आठ रेल्वे स्थानकांच्या नामांतराला मुख्यमंत्री यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर रेल्वे स्थानकांना नवी नावे लागू होतील.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आणि प्रस्ताव मार्गी लावण्याचा धडाका राज्यातील महायुती सरकारने लावला आहे. यात आता मुंबई रेल्वे स्थानकांच्या नामांतराचीही भर पडली आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गांवरील स्थानकांना ब्रिटिशांनी दिलेली नावे बदलून स्थानिक ओळख असलेली मराठी नावे देण्याबाबत खासदार यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्थानकांच्या नामांतराला मंजुरी दिली.'केंद्र सरकार पारतंत्र्याची ओळख पुसण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची जनतेची मागणी असून त्याला तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. यावर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे', असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर याबाबतचा प्रस्ताव सर्व्हेअर ऑफ इंडियाकडे जाऊन सुधारित रेल्वे स्थानकांची नावे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राच्या गृह आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर पुढील दहा दिवसांत रेल्वे स्थानकांतील नामफलक बदलण्यात येतील. भारतीय रेल्वेच्या अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस), प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये (पीआरएस) स्थानकांच्या आद्याक्षरानुसार बदल करण्यात येणार आहेत, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.रेल्वे स्थानकांच्या नामांतराच्या मंजुरीनंतर स्थानक कोड अर्थात इंग्रजीतील कोड बदलण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. स्थानकांच्या नामांतरानंतर स्थानक कोड बदलणार की, वापरातील कोड नामातरांनंतर जैसे थे राहणार याबाबत रेल्वे मंडळाच्या अधिसूचनेनंतर अधिक स्पष्टता येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सध्याची नावे - सुधारित नावेकरी रोड - लालबागसँडहर्स्ट रोड - डोंगरीमरिन लाइन्स - मुंबादेवीचर्नी रोड - गिरगावमुंबई सेंट्रल - नाना जगन्नाथ शंकर शेटकॉटन ग्रीन - काळाचौकीडॉकयार्ड - माझगावकिंग्ज सर्कल - तीर्थंकर पार्श्वनाथ