क्विंटन डी कॉकची वादळी खेळी, लखनौ सुपर जायंट्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचा दारूण पराभव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 3, 2024

क्विंटन डी कॉकची वादळी खेळी, लखनौ सुपर जायंट्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचा दारूण पराभव

https://ift.tt/5jvaU0n
आयपीएल २०२४ चा १५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. यात लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचा दारुण पराभव केला. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाने २० षटकात ५ गडी गमावून १८१ धावा केल्या.क्विंटन डी कॉकने ५६ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. डी कॉकचे शतक हुकले, परंतु त्याने १४४ च्या स्ट्राइक रेटने आरसीबीच्या गोलंदाजांना चकवा दिला. त्याच्याशिवाय निकोलस पूरनने अखेरपर्यंत शानदार फलंदाजी केली. त्याने २१ चेंडूत ४० धावांची नाबाद खेळी खेळली. पुरणने १९० च्या स्ट्राईक रेटने ५ षटकार आणि १ चौकार लगावला. या खेळाडूने शेवटच्या दोन षटकांमध्ये 40 धावांची नाबाद खेळीही खेळली.बेंगळुरू संघात अनेक मोठे फलंदाज आहेत पण लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध कोणीही खेळले नाही. महिपाल लोमरने सर्वाधिक ३३ धावा केल्या. रजत पाटीदारने २१ चेंडूत २९ धावांची खेळी केली. विराट कोहलीला केवळ २२ धावा करता आल्या. मॅक्सवेलला खातेही उघडता आले नाही आणि कॅमेरून ग्रीनच्या बॅटमधून केवळ ९ धावा झाल्या. वेगवान गोलंदाज मयंक यादव आरसीबीच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरला. या उजव्या हाताच्या गोलंदाजाने आपल्या वेगवान चेंडूंनी बेंगळुरूला घाबरवले. मयंक यादवने ४ षटकात १६ डॉट बॉल टाकले आणि १५ धावांत ३ बळी घेतले. मयंकने ग्लेन मॅक्सवेल आणि ग्रीनला बाद करून बेंगळुरूची मधली फळी उद्ध्वस्त केली. रजत पाटीदारही मयंकचा बळी ठरला.लखनौच्या या विजयानंतर आयपीएल २०२४ च्या पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. लखनौने ३ सामन्यांत दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे. या संघाने चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर गुजरात टायटन्सला मागे टाकले आहे. दुसरीकडे, आरसीबीने ४ पैकी तीन सामने गमावले आहेत. त्यांना केवळ एकच विजय मिळाला आहे. हा संघ गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर आहे.