दुर्दैवी! चिमुकले आईसोबत नदीवर गेले, मात्र परतलेच नाही, कुटुंबाचा मन हेलवणारा आक्रोश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 15, 2024

दुर्दैवी! चिमुकले आईसोबत नदीवर गेले, मात्र परतलेच नाही, कुटुंबाचा मन हेलवणारा आक्रोश

https://ift.tt/0rCy9Vu
उरण: मंगळवारी दुपारच्या सुमारास चौकनजीकच्या मोरबे धरणाच्या नदीपात्रातील पाण्यात दोन चिमुकल्या मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खालापूर तालुक्यातील जांभिवली येथील पाच वर्षीय आराध्या आणि आरव हे आईसोबत धावरी नदीवर गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या चिमुरड्यांची आई कपडे धुवून घरी परतली होती. दरम्यान, घरी आल्यानंतर काही वेळाने दोन्ही चिमुरडी घराजवळ दिसेनासे झाल्याने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळेस, या चिमुरड्यांच्या कुटुंबियांना ही मुले पुन्हा नदीपात्रात गेल्याची शंका आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. यामध्ये, चिमुकली आराध्या ही नदीपात्रातील पाण्यात निपचित पडलेली दिसून आली तर आरव हा काही अंतरावर चिखलात रुतलेला आढळून आला होता. यावेळी, या दोन्ही चिमुकल्यांना तात्काळ चौक येथील रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे जांभिवली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.