शेतकऱ्यांना मोठा दिलासा! निर्यात खुली झाल्याने कांदा दरात वाढ, प्रतिक्विंटलचा भाव असा... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 5, 2024

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! निर्यात खुली झाल्याने कांदा दरात वाढ, प्रतिक्विंटलचा भाव असा...

https://ift.tt/Lcx0t9A
म. टा. वृत्तसेवा, निफाड : केंद्र सरकारने तब्बल पावणेपाच महिन्यांनी कांदा निर्यात खुली केल्याने लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा दरांत ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत वाढ झाली. निफाड आणि विंचूर उपबाजार समितीमध्येही उन्हाळ कांद्याच्या दरात साधारण एवढीच वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.केंद्र सरकारने शनिवारी (दि. ४) कांदा निर्यात खुली करताना निर्यातीवर ५० टक्के शुल्क व ५५० डॉलर १ मेट्रिक टनासाठी मूल्य जाहीर करीत कांद्याची निर्यात जाहीर केल्यानंतर बाजार समितीमध्ये त्याचा लगेच चांगला परिणाम दिसून आला. त्यामुळे शुक्रवारच्या तुलनेत लासलगावसह निफाड आणि विंचूर उपबाजार समितीमध्येही कांद्याच्या दरात ५०० ते ८०० रुपयांपर्यंत वाढ झाली. लोकसभा निवडणुकीमुळे सत्ताधारी पक्षातील उमेदवारांवर कांदा पट्ट्यातल्या मतदार संघातील नाराजी पाहून सरकारने अखेर निर्यात खुली केली. परंतु, निर्यात खुली करताना अटी व शर्यती लावल्याने व्यापारी कांदा खरेदी करताना आस्ते कदम जाणार असल्याची चर्चा आहे.लासलगाव बाजार समितीतील दर (प्रतिक्विंटल)दिनांक कमीत कमी जास्तीत जास्त सरासरी३ मे ७०० १६४० १५२०४ मे ८०० २५५१ २१०० पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील दरदिनांक कमीत कमी जास्तीत जास्त सरासरी३ मे ११०० २३९१ २१००४ मे १५०० २३९१ २१००उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसू नये, म्हणून कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा निर्यातबंदी दरम्यान उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दिंडोरी आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असून, सभेत गोंधळ नको म्हणून मागे घेण्यात आली.- जयदत्त होळकर, संचालक, मुंबई बाजार समितीवाणिज्य मंत्रालयाच्या वतीने कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कांद्याच्या बाजार भावात ८०० रुपयांची वाढ झाल्याने त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी वारंवार पाठपुरावा करून वाणिज्य मंत्रालयाला निर्णय घेण्यास भाग पाडले.- सुवर्णा जगताप,माजी सभापती, लासलगाव बाजार समितीनिर्यातबंदी जाहीर झाली तेव्हा कांदा ३५०० ते ४००० रुपये क्विंटल होता. गेल्या पाच महिन्यात कमी दराने कांदा विक्री करावी लागली, हे झालेले नुकसान कोण भरून देणार? निर्यातबंदी दरम्यान विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल २००० रुपये अनुदान द्या.- वामनराव वनसे, शेतकरी, येवला केंद्राने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्यातबंदी उठवली आहे. २० मे नंतर ही निर्यात खुली राहते की बंद होते याबाबत व्यापाऱ्यांमध्ये शंका असल्याने विचार करून कांदा खरेदी करण्याची व्यापाऱ्यांची भूमिका आहे. शिवाय निर्यातीच्या धरसोड धोरणामुळे परदेशातील ग्राहक तुटला आहे.- प्रवीण कदम, व्यापारीबाजार फी ५० पैसे करण्याचा ठरावपिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य व उपबाजार आवारात कांदा शेतीमालावरील बाजार फी आकारणीचे दर ५० पैसे करण्याबाबत व्यापाऱ्यांनी मागणी केली होती. याबाबत शनिवारी (दि.४)बाजार समितीची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. संचालक मंडळ व कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा करून कांदा विक्रीवर बाजार फी आकारणी ५० पैसे करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर, उपसभापती जगन्नाथ कुटे, संचालक अनिल कदम, ज्ञानेश्वर शिरसाट, गोकुळ गिते, दीपक बोरस्ते, रामभाऊ माळोदे, डॉ. प्रल्हाद डेर्ले, मनिषा खालकर, अमृता पवार, दिलीपराव मोरे, यतीन कदम आदींसह संचालक व व्यापारी उपस्थित होते.