-
या यादीत कर्नाटकातील मंगळुरुला पहिले स्थान मिळाले आहे. स्वच्छ आणि नेटके असलेले मंगळुरु कमी गुन्हेगारी आणि चांगली कायदा आणि सुव्यवस्थेमुळे पहिल्या क्रमांकावर आले आहे.
-
दुसरा क्रमांक गुजरातच्या वडोदराचा आहे. आपल्या शांत जीवनशैली आणि सुरक्षेसाठी हे शहर ओळखले जाते. तिसरा क्रमांक गुजरातच्या अहमदाबादला मिळाल आहे. हे मोठी औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे.
-
गुजरातचे सुरत चौथ्या स्थानावर आहे. हिरे व्यापारासाठी आणि स्वच्छतेसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. पाचव्या क्रमांकावार राजस्थानची राजधानी जयपूरचा क्रमांक आला आहे,त्यास पिंक सिटी म्हणूनही ओळखले जाते.
-
सहावा क्रमांक महाराष्ट्रातील नवी मुंबईचा आलेला आहे. प्लानिंग आणि इन्फ्रास्क्ट्रचर मुळे देशातील सुनियोजित शहरात याची गणती होते. सातव्या क्रमाकांवर केरळची राजधानी तिरुवनंतपुरमचे नाव असून हे शहर उच्च शिक्षण आणि सुरक्षेसाठी प्रसिद्ध आहे.
-
तामिळनाडूची राजधानी चेन्नईचा क्रमांक आठवा आला आहे. समुद्र किनाऱ्यावरील हे शहर लोकांची वागणूक आणि सुरक्षित वातावरणासाठी ओळखले जाते.
-
नववा क्रमांक पुण्याचा आला आहे, शिक्षण आणि आयटी हब म्हणून पुणे प्रसिद्ध आहे. तर टॉप-१० मध्ये शेवटचा क्रमांक चंदीगडचा आलेला आहे. जे स्वच्छता आणि प्लानिंगसाठी ओळखले जाते. या यादीत मुंबईचे नाव न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
-
या अहवालातून हे स्पष्ट होते की भारतात अशी अनेक शहरं आहेत जेथील सुरक्षा, स्वच्छता आणि चांगली जीवनशैली लोकांना आकर्षित करते. ही यादी सुरक्षित शहर शोधणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते.
from TV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़ https://ift.tt/X2w7akm
via IFTTT