फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेलमध्ये आयफोन 16 सह ‘या’ 5 जी फोनवर मिळणार मोठी सूट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 14, 2025

फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेलमध्ये आयफोन 16 सह ‘या’ 5 जी फोनवर मिळणार मोठी सूट

फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेलमध्ये आयफोन 16 सह ‘या’ 5 जी फोनवर मिळणार मोठी सूट

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेल सुरू झालेला आहे. गेल्या काही दिवसांत ई-कॉमर्स दिग्गज कंपनीचा हा दुसरा स्वातंत्र्य दिन-थीम सेल इव्हेंट आहे. याआधी 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान कंपनीने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी फ्रीडम सेल सुरू केला होता. त्यात आता कंपनी पुन्हा एकदा आपल्या नवीन सेल ग्राहकांसाठी सुरू केले आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट, वेअरेबल्स, लॅपटॉप, घरगुती उत्पादनांसह अनेक गोष्टींवर सर्वात मोठे डील उपलब्ध असतील.

एवढेच नाही तर सेल दरम्यान, Apple च्या iPhone, Motorola, Nothing, Oppo आणि Vivo सारख्या ब्रँडचे डिव्हाइस सर्वात कमी किमतीत उपलब्ध असतील. सेलच्या अगदी आधी, Flipkart ने काही स्मार्टफोन डील देखील जाहीर केल्या आहेत. सेल पेजनुसार, एप्रिलमध्ये भारतात 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला Oppo K13 5G सेलमध्ये फक्त 15,999 रुपयांना उपलब्ध असेल. याशिवाय, तुम्ही Oppo K13x 5G फक्त 10,999 रुपयांना खरेदी करू शकाल.

फ्लिपकार्ट सेल स्मार्टफोन डील्स

ई-कॉमर्स दिग्गज कंपनीचे म्हणणे आहे की सेलमध्ये अनेक लोकप्रिय डिव्हाइसेस अतिशय स्वस्त किमतीत उपलब्ध असतील. तथापि त्यांच्या विक्री किंमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. अशातच फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये खरेदीदारांना Samsung Galaxy S24, Vivo T4 5G, Realme P3 5G, iPhone 16, Motorola Edge 60 Fusion, Samsung Galaxy S24 FE, Nothing Phone 2 Pro सारख्या अनेक स्मार्टफोनवर मोठी सूट मिळू शकेल.

आयफोन 16 वरही सूट

गेल्या फ्लिपकार्ट फ्रीडम सेलमध्ये सेल बारमध्ये उपलब्ध असलेले अनेक हँडसेट सवलतींसह उपलब्ध होते. आयफोन 16 हा हँडसेट 69,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला होता, जो त्याच्या लाँच किमतीपेक्षा कमी आहे. तर मोटोरोला एज 60 फ्यूजन गेल्या सेलमध्ये 20,999 रुपयांना उपलब्ध होता. तर सॅमसंग गॅलेक्सी एस24 हा फोन 46,999 रूपयांना तर गॅलेक्सी एस24 एफई सेल दरम्यान 49,999 रूपयांना खरेदीसाठी उपलब्ध होते. तर आताच्या स्वातंत्र्य दिनाच्या या सेलमध्येही त्यांची किंमत सारखीच दिसून येत आहे.