-
अनेक लोक घरात आवडीने मनी प्लान्ट लावतात. घरात पैशांची कमतरता भासू नये म्हणून अनेकजण हे झाड आवर्जुन लावतात. मात्र हे झाड लावण्यासंदर्भात वास्तूशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहेत.
-
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार हे झाड घरात न ठेवल्यास तुम्हाला फायदा होण्याऐवजी मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरात मनी प्लान्ट ठेवताना कोणते नियम पाळले पाहिजेत हे जाणून घेऊ या...
-
वास्तूशास्त्रानुसार मनी प्लान्टला घराच्या उत्तर दिशेत ठेवायला हवे. घराचे मुख्य द्वार याच दिशेला असेल तर तुम्ही मनी प्लान्ट मुख्य द्वारापाशीच ठेवायला हवे. घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला नसेल तर उत्तर दिशेला असणाऱ्या खिडकीत मनी प्लान्ट ठेवले पाहिजे.
-
घरात मनी प्लान्ट लावताना या झाडाची वेल वरच्या दिशेला गेली पाहिजे, अशी तजवीज करा. मनी प्लान्ट एकदा सुकून गेल्यानंतर ते घरातून फेकून द्या. त्याला चुकूनही घरात ठेवू नका.
-
मनी प्लान्ट लावल्यानंतर घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. याच सकारात्मक प्रभावामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. त्यामुळेच घरात मनी प्लांट ठेवायला हवे.
-
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.





