
आशिया कप 2025 स्पर्धेआधी श्रीलंका क्रिकेट टीम सध्या झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. श्रीलंका या दौऱ्यात झिंबाब्वे विरुद्ध 2 वनडे आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंकेने या दौऱ्याची विजयी सुरुवात केली. श्रीलंकेने शुक्रवारी 29 ऑगस्टला पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिंबाब्वेवर 7 धावांनी मात करत विजयी सुरुवात केली. श्रीलंकेने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यामुळे श्रीलंकेला दुसरा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान झिंबाब्वेसमोर अंतिम सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळू शकते. या निमित्ताने उभयसंघातील दुसरा सामना कुठे पाहायला मिळणार? हे जाणून घेऊयात.
झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना कधी?
झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना रविवारी 31 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे.
झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना कुठे?
झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे आयोजित करण्यात आला आहे.
झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका दुसरा सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका दुसरा सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तर 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. मात्र हा सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहता येईल.
झिंबाब्वेचा पहिल्या सामन्यात निर्णायक क्षणी पराभव
दरम्यान झिंबाब्वेला पहिल्या सामन्यात अखेरच्या क्षणी सामना गमवावा लागला. श्रीलंकेच्या दिलशान मधुशंका याने 50 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेत हॅटट्रिक घेतली आणि टीमला विजयी केलं. श्रीलंकेने झिंबाब्वेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. झिंबाब्वेने या धांवाचा पाठलाग करत 49 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 289 धावा केल्या होत्या. त्यामुळे झिंबाब्वेला शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावांची गरज होती. मात्र दिलशानने 3 विकेट्स घेत सामना फिरवला. दिलशानने हॅटट्रिकनंतर उर्वरित 3 चेंडूत 2 धावा दिल्या. श्रीलंकेने अशाप्रकारे पहिला विजय मिळवला. त्यामुळे आता झिंबाब्वे या पराभवाची परतफेड करते की श्रीलंका सामन्यासह मालिका जिंकते? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.