
आशिया कप २०२५ स्पर्धेचा बांग्लादेश अफगाणिस्तान यांच्यात चुरशीचा सामना झाला. हा सामन्यातील विजय काहीही करून बांगलादेशसाठी महत्त्वाचा होता. अपेक्षेप्रमाणे बांगलादेशने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा ८ धावांनी धुव्वा उडवला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी गमवून १५४ धावा केल्या आणि १५५ धावांचं आव्हान दिलं. तन्झिद हसनने या सामन्यात ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच चेंडूवर सेदिकुल्लाह अटल बाद झाला. त्यानंतर इब्राहिम झाद्रानही काही खास करू शकला नाही. त्याने ५ धावा केला आणि बाद झाला. रहमनतुल्लाह गुरबाजने ३५ आणि अझमतुल्लाह ओमरजाई याने ३० धावा केल्या. या व्यतिरिक्त कोणी काही खास करू शकलं नाही.
अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खान म्हणाला की, आम्ही शेवटपर्यंत खेळात होतो पण खेळ संपवू शकलो नाही. १८ चेंडूत ३० धावा करणे खूप सोपे होते. आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहोत. तसं खेळलो नाही. आम्ही स्वतःवर खूप दबाव निर्माण होऊ दिला. आम्ही ज्या पद्धतीने चेंडू घेऊन परतलो आणि त्यांना १६० च्या आत रोखले ते खास होते.परंतु फलंदाजीसह आम्ही काही बेजबाबदार फटके खेळले. टी२० मध्ये कधीकधी विरोधी संघ पहिल्या सहा षटकांतच खेळ हिरावून घेतो.पण नंतर तुम्हाला परत यावे लागते. या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. आशिया कपमध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. आम्हाला श्रीलंकेसाठी चांगली तयारी करावी लागेल, ते आमच्यासाठी एक मोठे आव्हान असेल.’
बांगलादेशचा कर्णधार लिटन दास म्हणाला की, सामना जिंकणे हा एक दिलासादायक अनुभव होता. पण शेवटच्या ४-५ षटकांत आम्ही फारशी चांगली फलंदाजी केली नाही. मला वाटले की पुरेशा धावा झाल्या होत्या पण तरीही आम्हाला वाटले की आम्ही १५-२० धावा कमी आहोत. नसुम आणि रिशादने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती खास होती. आज तमिमने खूप चांगली फलंदाजी केली, सलामीची भागीदारी महत्त्वाची होती.
श्रीलंकेने अफगाणिस्तानला हरवले तर श्रीलंका आणि बांग्लादेश सुपर ४ फेरीत पात्र ठरेल. अफगाणिस्तानने श्रीलंकेला हरवलं, तर श्रीलंका-बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे गुण बरोबरीत असतील. नेट रनरेटच्या आधारावर सुपर ४ फेरीचे दोन संघ ठरतील. श्रीलंकेचा नेट रनरेट बांगलादेशपेक्षा कमी व्हायचा असेल. तर त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध सुमारे ७० धावांनी किंवा ५० चेंडू शिल्लक ठेवून पराभव पत्करावा लागेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन तमीम, लिटन दास (कर्णधार आणि विकेटकीपर), सैफ हसन, तौहिद हृदयॉय, जाकेर अली, नसुम अहमद, नुरुल हसन, शमीम हुसेन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद.
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सेदीकुल्लाह अटल, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गझनफर, फजलहक फारूकी.