डोनाल्ड ट्रम्प हादरले, थेट बसला मोठा धक्का, अखेर सोशल मीडियावरून मनातील भावना.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 11, 2025

डोनाल्ड ट्रम्प हादरले, थेट बसला मोठा धक्का, अखेर सोशल मीडियावरून मनातील भावना..

डोनाल्ड ट्रम्प हादरले, थेट बसला मोठा धक्का, अखेर सोशल मीडियावरून मनातील भावना..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर ते भारताबद्दल भडकावू विधाने करताना दिसले. हेच नाही तर अमेरिकेने भारताला रशियाचे कपडे धुण्याचे मशिन आणि टॅरिफचा महाराजा म्हटले. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हत्यार म्हणून वापरत असल्याचाही आरोप केला जातोय. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे भारत आणि अमेरिकेतील मागील काही वर्षांचे संबंध तणावात आहेत. फक्त भारतच नाही तर इतरही अनेक देश हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत मोठा झटका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकदम जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

अमेरिकेच्या युटा राज्यात बुधवारी मोठी घटना घडली आणि संपूर्ण अमेरिका हादरली. टर्निंग पॉइंट यूएसएचे सह-संस्थापक चार्ली कर्क (वय 31) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर एकच खळबळ उडाली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चक्क भर स्टेजवर भाषण देत असताना ही हत्या करण्यात आली. कर्क ओरेम येथील युटा व्हॅली युनिव्हर्सिटी येथे एका रॅलीला संबोधित करत असतानाच ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चार्ली कर्क हे एका रॅलीनंतर विद्यार्थ्यांना स्टेजवरून मार्गदर्शन करत होते. यावेळी गर्दीतून एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर ते थेट स्टेजवर पडले. त्यांना लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चार्ली कर्क यांच्या निधनाची बातमी कळताच डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच अत्यंत निकटवर्तीय म्हणून चार्ली कर्कची ओळख होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी चार्ली कर्क यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिलीये. युटाचे गव्हर्नर स्पेन्सर कॉक्स यांनी चार्ली कर्क यांची हत्या म्हणजे राजकीय हत्या म्हटले. हेच नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगाराला शिक्षा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चार्ली कर्क यांच्या हत्येनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला असून ते चिंतेत असल्याचीही माहिती मिळतंय.