IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक टी 20 धावा करणारे टीम इंडियाचे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 12, 2025

IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक टी 20 धावा करणारे टीम इंडियाचे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?

IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक टी 20 धावा करणारे टीम इंडियाचे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?

टी 20I आशिया कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत ए आणि बी या दोन्ही गटांचा प्रत्येकी 1-1 सामना झाला आहे. अफगाणिस्तानने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हाँगकाँगवर विजय मिळवला. तर भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यूएईवर मात केली. तर तिसऱ्या सामन्यात हाँगकाँग विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. मात क्रिकेट चाहत्यांचं या स्पर्धेतील सर्वात मोठ्या सामन्याकडे लक्ष लागून आहे. क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याचे वेध लागले आहेत. या सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. येत्या काही तासांमध्ये या सामन्याला सुरुवात होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध भारत यांच्यात 14 सप्टेंबरला सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील दुसरा सामना असणार आहे. भारताने या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताला पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवून सुपर 4 मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. यंदा टी 20 फॉर्मेटने आशिया कप होत आहे. या निमित्ताने भारत विरुद्ध पाकिस्तान टी 20I सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान टी 20I सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा माजी क्रिकेटर विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने 11 सामन्यांमध्ये 492 धावा केल्या आहेत. विराटने पाकिस्तान विरुद्ध 5 अर्धशतकं झळकावली होती.

त्यानंतर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझवानने 228 धावा केल्या आहेत. या यादीत पाकिस्तानचा माजी अनुभवी ऑलराउंडर शोएब मलिक याने 164 धावा केल्या आहेत. मोहम्मद हफीज चौथ्या स्थानी आहे. तर माजी ऑलराउंडर युवराज सिंह पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.

सर्वाधिक धावा आणि 5 अव्वल फलंदाज

युवराज सिंह : 155 धावा
मोहम्मद हाफीज : 156 धावा
शोएब मलिक : 164 धावा
मोहम्मद रिझवान : 228 धावा
विराट कोहली : 492 धावा

टी 20I आशिया कपमध्ये सरस कोण?

दरम्यान यंदा टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्याची तिसरी वेळ आहे. याआधी भारत विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ टी 20I आशिया कप स्पर्धेत 3 वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने या 3 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने एकमेव सामना जिंकला आहे. त्यामुळे टीम इंडिया 14 सप्टेंबरला विजय मिळवत पाकिस्तानवर टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा विजय नोंदवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.