
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मागील काही दिवसांपासून सतत टीका होताना दिसतंय. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर भारत, चीन आणि रशियाची मैत्री वाढली. परत एकदा डोनाल्ड ट्रम्प हे भारतासोबत अगोदरप्रमाणे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताला चीन आणि रशियाच्या अधिक जवळ जाण्यापासून रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करत आहेत. आता नुकताच भडकावू विधानांनंतर परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना भारताची आठवण झालीये. त्यांनी नुकताच भारताबद्दल अत्यंत मोठे विधान केले. मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, वॉशिंग्टन आणि दिल्ली यांच्यात सुरू असलेली व्यापार चर्चेचा यशस्वी निकाल लागेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, मला हे सांगताना खूप जाास्त आनंद होतोय की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार तणाव दूर करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मी माझे अत्यंत जवळचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलण्यासाठी उत्सुक आहे. मला मनातून खरोखरच विश्वास आहे की, आमचे दोन महान देश या व्यापार चर्चांमधून चांगले निर्णय घेतील. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, मला आयुष्यभर नरेंद्र मोदी यांचा खास मित्र म्हणून राहायचे आहे.
ते एक चांगल पंतप्रधान आहेत. मात्र, जे सध्या जे वागत आहे ते मला कळत नाही. बाकी आमचे नाते आणि संबंध चांगले आहेत आणि पुढेही राहणार आहेत. चीनसोबतची भारताची जवळीकता वाढल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार अजूनही भारताबद्दल वादग्रस्त विधाने करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे देखील काही दिवसांपूर्वी भारताबद्दल चुकीच्या गोष्टी बोलताना दिसले. मात्र, आता त्यांची भाषा बदलली आहे.
भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा जवळपास बंद झाली होती. हेच नाही तर अमेरिकेचे व्यापार डिल टीम हे महत्वाच्या बैठकीसाठी दिल्लीत येणारे होते, तो त्यांचा नियोजित दाैरा होता. मात्र, टॅरिफच्या वादातून रद्द करण्यात आला. आता एक पाऊस मागे घेऊन परत एकदा व्यापार चर्चा ही अमेरिकेकडून केली जात असल्याचे बघायला मिळतंय.