Cricket : विराट ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार, प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 28, 2025

Cricket : विराट ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार, प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी?

Cricket : विराट ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार, प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी?

टीम इंडिया रविवारी 28 सप्टेंबरला टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात 15 ऑक्टोबरपासून प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी झारखंडने संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर ईशान किशन याला रणजी ट्रॉफीसाठी झारखंड क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत विराट ईशानच्या नेतृत्वात खेळणार आहे. हा विराट कोहली नसून विराट सिंह आहे. विराटला झारखंडचा उपकर्णधार करण्यात आलं आहे.

रणजी ट्रॉफीसाठी झारखंड क्रिकेट टीम : ईशान किशन (कर्णधार), विराट सिंह (उपकर्णधार), शरनदीप सिंह, शिखर मोहन, कुमार कुशाग्र, कुमार सूरज, अनुकूल रॉय, मनीषी, विकास कुमार, जतिन कुमार पांडे, विकास सिंह, आदित्य सिंह, साहिल राज, शुभम सिंह, आर्यमान सिंह आणि ऋशव राज.