हारिस रऊफच्या घृणास्पद कृत्याचं बुमराहने दिलं उत्तर, विकेट घेतल्यानंतर केलं असं सेलीब्रेशन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 29, 2025

हारिस रऊफच्या घृणास्पद कृत्याचं बुमराहने दिलं उत्तर, विकेट घेतल्यानंतर केलं असं सेलीब्रेशन

हारिस रऊफच्या घृणास्पद कृत्याचं बुमराहने दिलं उत्तर, विकेट घेतल्यानंतर केलं असं सेलीब्रेशन

आशिया कप स्पर्धेच्या अंतिम आणि हायव्होल्टेज सामन्यात भारत पाकिस्तान संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात काहीही करून विजय मिळवणं भाग आहे. कारण आतापर्यंत केलेल्या सर्व मेहनतीचं ते फळ असणार आहे. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि सूर्यकुमार यादवने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने या सामन्यात सावध सुरुवात केली. त्यामुळे पावर प्लेमध्ये पाकिस्तानने एकही विकेट दिली नाही. त्यामुळे विकेट वाचवून नंतर फटकेबाजी करण्याचा प्लान होता. मात्र हा प्लान फसला असंच म्हणावं लागेल. साहिबजादा फरहान बाद झाला आणि पाकिस्तानच्या धडाधड विकेट पडल्या. कुलदीप यादवने तर पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. त्यामुळे त्यांना 20 षटकं पूर्ण खेळता आली नाहीत. तसेच जसप्रीत बुमराहने डेथ ओव्हरमध्ये पाकिस्तानला भेदक मारा केला. यावेळी त्याने काढलेली हारिस रऊफची विकेट खास होती. कारण त्याने त्याचा त्रिफळा उडवल्यानंतर घृणास्प कृत्याचं उत्तर दिलं. यावेळी जसप्रीत बुमराह वेगळ्याच मूडमध्ये दिसला.

हारिस रऊफची विकेट काढल्यानंतर जसप्रीत बुमराहने जसाच तसं उत्तर दिलं. त्याची सुरुवात सुपर 4 फेरीतून हारिस रऊफने केली होती. भारताच्या डावात रऊफ बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करत होता. तेव्हा त्याने क्रीडाप्रेमी त्याला विराट कोहलीच्या नावाने डिवचत होते. तेव्हा त्याने भारतीय क्रीडाप्रेमींना फायटर जेट पाडल्याची कृती करून दाखवली. त्या कृतीनंतर भारतीय क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. आयसीसीने त्याली दोषी धरत त्याच्या सामना मानधनातून 30 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावली आहे.

जसप्रीत बुमराहने त्याला परफेक्ट यॉर्कर टाकला. यामुळे हारिस रऊफला चेंडूत कळला नाही आणि दांड्या घेऊन गेला. तो फक्त तो चेंडू पाहत राहिला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने प्लेन बरोबर घुसल्याची एक्शन केली. त्याच्या कृतीचं आता क्रीडाप्रेमी कौतुक करत आहेत. कारण त्याला योग्य धडा काय तो बुमराहने शिकवला.