SL vs AFG : Mohammad Nabiचा कारनामा, 9 दिवसात महारेकॉर्डची बरोबरी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 19, 2025

SL vs AFG : Mohammad Nabiचा कारनामा, 9 दिवसात महारेकॉर्डची बरोबरी

SL vs AFG : Mohammad Nabiचा कारनामा, 9 दिवसात महारेकॉर्डची बरोबरी

आशिया कप 2025 स्पर्धेत बी ग्रुपमधील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार ऑलराउंडर मोहम्मद नबी याने श्रीलंकेविरुद्ध इतिहास घडवला आहे. नबीने श्रीलंकेविरुद्ध धमाका केला. नबीने अफगाणिस्तानच्या डावातील 20 व्या अर्थात शेवटच्या ओव्हरमधील पहिल्या 5 बॉलमध्ये सलग 5 सिक्स ठोकले. नबीने 5 सिक्स ठोकून अफगाणिस्तानला अडचणीतून बाहेर काढलं. नबीच्या खेळीमुळे अफगाणिस्तानला 169 धावा करता आल्या. नबीने शेवटच्या ओव्हरमध्ये 5 सिक्ससह एकूण 32 रन्स केल्या. नबीने यासह अर्धशतकही पूर्ण केलं. नबीने यासह महारेकॉर्डची बरोबरी केली.

नबी टी 20i क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानसाठी वेगवान अर्धशतक शतक करणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला. नबीने अवघ्या 9 दिवसातच आपल्या सहकाऱ्याच्या विक्रमाची बरोबरी केली. नबीआधी हाँगकाँग विरुद्ध ऑलराउंडर अझमतुल्लाह ओमरझई याने वेगवान अर्धशतक केलं होतं. अझमतुल्लाहने 9 सप्टेंबरला हाँगकाँग विरुद्ध हा कारनामा केला होता. त्यानंतर आता नबीने ओमरझईच्या विक्रमाची बरोबरी केलीय.

नबीची स्फोटक खेळी

अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तानची निराशाजनक सुरुवात झाली. अफगाणिस्तानने 71 धावांवर पाचवी विकेट गमावली. त्यानंतर नबी मैदानात आला आणि अफगाणिस्तानचा डाव सावरला. नबीने संथ सुरुवात केली. नबीने त्याच्या खेळीतील पहिल्या 10 बॉलमध्ये 1 सिक्ससह 14 धावा केल्या होत्या. मात्र नबीने त्यानंतर गिअर बदलला. नबीने पुढील 10 बॉलमध्ये 34 रन्स केल्या. नबीने या दरम्यान 3 फोर आणि 5 सिक्स ठोकले. नबीने अशाप्रकारे 20 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. नबीने यासह अझमतु्ल्लाहच्या विक्रमाची बरोबरी साधली.

शेवटच्या 12 बॉलमध्ये 49 रन्स

दरम्यान मोहम्मद नबी याने अफगाणिस्तानसाठी नूर अहमद याच्या मदतीने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये एकूण 49 रन्स जोडल्या. नबीने 20 व्या ओव्हरमध्ये दुनिथ वेलालागे याच्या बॉलिगंवर सलग 5 सिक्स झळकावले. दुनिथने या ओव्हरमध्ये एका नो बॉलसह एकूण 32 रन्स दिल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 169 रन्स करता आल्या. नबीने 22 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्ससह एकूण 60 रन्स केल्या.

राशिद खान आणि इब्राहीम झाद्रानचं निर्णायक योगदान

तसेच नबी व्यतिरिक्त कॅप्टन राशिद खान आणि इब्राहीम झाद्रान या दोघांनी प्रत्येकी 24-24 धावा केल्या तर श्रीलंकेसाठी दुष्मंथा चमीरा, दुनिथ वेलालागे आणि दासून शनाका या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.