-
आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 147 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान गाठताना भारताची सुरुवात काही खास झाली नाही. पावर प्लेमध्ये भारताने महत्त्वाचे दोन गडी गमावले. त्यामुळे भारतावरील दबाव वाढला.
-
कर्णधार सूर्यकुमार यादवची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. आशिया कपमध्येच नव्हे तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळेच त्याच्यावर टीका होत आहे. कर्णधार नसता तर त्याला संघाबाहेर बसण्याची पाळी आली असती.
-
अंतिम सामन्यात अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर खरं तर सूर्यकुमार यादवकडे संधी होती. पण अंतिम सामन्यात काही खास करू शकला नाही. अवघी 1 धाव करून तंबूत परतला. त्याने 5 चेंडूत 1 धाव केली. पण नकोसं शतक करून गेला.
-
सूर्यकुमार यादवने या वर्षी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळलेल्या 11 डावांमध्ये 12 च्या जवळपास सरासरीने फक्त 100 धावा केल्या आहेत.या वर्षी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 धावा पूर्ण केल्या.
-
टीम इंडिया सध्या आशिया कपचा गतविजेता आहे. 2023 मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया कप जिंकला. पण अंतिम फेरीत भारतावर दबाव वाढला आहे. कारण पावर प्लेमध्ये भारताला तीन धक्के बसले आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क/कन्नडवरून)