ZIM vs SL : आशिया कपआधी शेवटची टी 20I मालिका, श्रीलंका सज्ज, विजयी सुरुवात करणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 3, 2025

ZIM vs SL : आशिया कपआधी शेवटची टी 20I मालिका, श्रीलंका सज्ज, विजयी सुरुवात करणार?

ZIM vs SL : आशिया कपआधी शेवटची टी 20I मालिका, श्रीलंका सज्ज, विजयी सुरुवात करणार?

चरिथ असलंका यांच्या नेतृत्वात श्रीलंकेने झिंबाब्वेचा एकदिवसीय मालिकेत धुव्वा उडवला. श्रीलंकेने सलग दोन्ही सामने जिंकत झिंबाब्वेला 2-0 अशा फरकाने क्लीन स्वीप केलं. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांची टी 20i मालिका होणार आहे. श्रीलंकेची आशिया कपआधी ही शेवटची टी 20i मालिका असणार आहे. श्रीलंकेसाठी या महत्त्वाच्या स्पर्धेआधी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. श्रीलंकेचा वनडेनंतर टी 20i मालिकेतही झिंबाब्वेला पराभूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर यजमानांचा श्रीलंकेवर मात करुन एकदिवसीय मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे.

सिकंदर रझा या टी 20i मालिकेत झिंबाब्वेचं नेतृत्व करणार आहे. तर चरिथ असलंका याच्याकडे श्रीलंकेच्या टी 20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. उभयसंघातील पहिला टी 20i सामना कुठे आणि कधी पाहता येणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका पहिला टी 20i सामना केव्हा?

झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका पहिला टी 20i सामना बुधवारी 3 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका पहिला टी 20i सामना कुठे?

झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका पहिला टी 20i सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका पहिला टी 20i सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका पहिला टी 20i सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर मोबाईलवर हा सामना फॅनकोड एपद्वारे पाहायला मिळेल.

एकदिवसीय मालिकेत 0-2 ने पराभव

दरम्यान झिंबाब्वेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र शेवटच्या षटकात श्रीलंकेने गेम फिरवला. दिलशान मधुशंका याने शेवटच्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलवर सलग 3 विकेट्स घेत हॅटट्रिक घेतली. दिलशानने अशाप्रकारे 10 धावांचा यशस्वी बचाव करत श्रीलंकेला 7 धावांनी विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. तर श्रीलंकेने झिंबाब्वेवर दुसर्‍या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला.

तिन्ही सामने एकाच स्टेडियममध्ये

दरम्यान उभयसंघात होणारे तिन्ही सामने हे एकाच स्टेडियममध्ये होणार आहेत. या तिन्ही सामन्यांचा थरार हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये रंगणार आहे.