भारत रशियाकडून तेल खरेदी करणार बंद? जगाला मोठा धक्का, अमेरिकेचा अत्यंत मोठा दावा, भारताने थेट.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 5, 2025

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार बंद? जगाला मोठा धक्का, अमेरिकेचा अत्यंत मोठा दावा, भारताने थेट..

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार बंद? जगाला मोठा धक्का, अमेरिकेचा अत्यंत मोठा दावा, भारताने थेट..

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिका आणि भारतातील संबंध तणावात आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे. मात्र, भारताने तेल खरेदी सुरूच ठेवल्याने अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. यासोबतच अजूनही काही मोठे निर्णय भारताच्या विरोधात घेतले. यादरम्यान भारताने स्वदेशी वस्तूंचा नारा दिला. रशियाकडून तेल खरेदी भारत करत आहे. आम्ही आमच्या नागरिकांसाठी जे काही योग्य आहे ते करू असे भारताने अगदी स्पष्ट म्हटले. आता अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी अत्यंत मोठा दावा भारताबद्दल केला आहे, ज्याने जगाची झोप उडाली. पुढील काही काळात अनेक समीकरणे बदलण्याचे हे अत्यंत मोठे संकेत नक्कीच म्हणावे लागतील.

अमेरिकी व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीयर यांनी म्हटले की, भारत रशियाच्या ऊर्जावर आता कमी निर्भर झालाय. त्यांनी हळूहळू हे करण्यास याला सुरूवात केली. यावरून पुढील दिशा स्पष्ट दिसत आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव काही दिवसांमध्ये कमी होतील. न्यूयॉर्कमधील इकोनॉमिक क्बलच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक गोष्टींवर खुलासा केला.

ग्रीयर म्हणाले, भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला कोणताही फार फायदा होत नाही. आम्हाला स्पष्टपणे वाटते की, भारत आता याच्याशिवायही पुढे जाऊ शकतो. आम्ही हे बघत आहोत की, भारताने विविधीकरण सुरू केलंय. भारताने 2022 नंतर रशिया-युक्रेन युद्धादरम्यान तेल खरेदी वाढवली. पण आता कुठेतरी सकारात्मक पाऊल टाकताना भारत दिसतोय.

हे असे काहीतरी आहे की, आम्हाला वाटते की, भारत नक्कीच करू शकतो. मनातून सांगायचे झाले तर भारतालाही काही गोष्टी समजल्या आहेत. मी अगदी स्पष्ट करू इच्छितो की, अमेरिकेला कधीच भारताच्या विदेश संबंध आणि नियंत्रणामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. भारत रशियाकडून मोठ्या प्रमणात तेल खरेदी करत असल्याने युक्रेन युद्धाला मदत होत असल्याचे फक्त आमचे म्हणणे आहे, बाकी काहीच नाही. आम्हाला फक्त पुतिन यांच्यावरील दबाव वाढवायचा आहे. ग्रीयरच्या बोलण्यावरूव हे संकेत आहेत की, भारत रशियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोय.