या शिक्षकाने श्रीमंतीत केली शाहरुख खानवर मात, कोण आहे अलख पांडे ? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 6, 2025

या शिक्षकाने श्रीमंतीत केली शाहरुख खानवर मात, कोण आहे अलख पांडे ?

या शिक्षकाने श्रीमंतीत केली शाहरुख खानवर मात, कोण आहे अलख पांडे ?

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील एका तरुण शिक्षकाने श्रीमंतीत बॉलिवूडच्या शाहरुख खानवर देखील मात केली आहे. हा तरुण भारतातील सर्वात श्रीमंत शिक्षक आहे. या तरुणाचा कोचिंग क्लास असून त्याचे नाव ‘फिजिक्सवाला’ आहे. या संदर्भात तुम्ही ऐकले असेलच. कोविड काळात हा कोचिंग क्लास खूपच प्रसिद्ध झाला होता.त्यानंतर या कोचिंग क्लासला खूपच प्रसिद्धी मिळाली. या कोचिंगने शिक्षण सोपे बनवले.

या कोचिंग क्लासचा मालक आहे अलख पांडे. हा अलख पांडे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रयागराजच्या या अलख पांडे याने श्रीमंतीत शाहरुख खानला देखील मागे टाकले आहे. प्रयागराजच्या संगमनगरीतील या अलख पांडे याने बॉलीवुडचा किंग खान याला श्रीमंतीत पाठी टाकले आहे. अलख पांडे यांच्या संपत्तीत प्रचंड वेगाने वाढ झाल्याने त्यांनी शाहरुखवर मात केली आहे.

शाहरुख खान पेक्षा श्रीमंत अलख पांडे

आधी अलख पांडे याने भारताचा सर्वात श्रीमंत टीचर (India Richest Teacher Alakh Pandey) होण्याचा मान मिळवला होता. आता त्याने शाहरुख खानला मागे टाकले आहे. हुरुन इंडियाच्या 2025 च्या श्रीमंतांच्या यादीत त्याचे नाव शाहरुख खानच्या पुढे आहे. अलख पांडे याच्या नेटवर्थमध्ये 223% वाढ नोंदली गेली आहे. त्याची संपत्ती वाढून 14,510 कोटी रुपये झाली आहे.

तर बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याची ( Shah Rukh Khan Net Worth ) संपत्ती या वर्षी वाढून 12,490 कोटी रुपये झाली आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये सामील झाल्यानंतर अलख पांडे बातम्यात आला आहे. या शिक्षकाने आता संपत्तीत शाहरुख खानला मागे टाकले आहे.

अलख पांडे त्याचा कोचिंग क्लास फिजिक्सवालामुळे संपत्तीत प्रगती करत आहे. या एडटेक कंपनीने FY2025 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. या कंपनीचा एकूण तोटा 1,131 कोटी रुपयांनी घटून 243 कोटी रुपये राहिला आहे. तर महसूलाचा विचार करता त्यात मोठी वाढ झाली आहे. फिजिक्सवालाचा महसूल 1,940 कोटीवरुन वाढून 2,886 कोटी रुपये झाला आहे.

पहिल्यांदा या यादीत शाहरुख

शाहरुख खान पहिल्यांदा या अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 2024 च्या तुलनेत त्याच्या संपत्तीत 71 वाढ झाली आहे. त्यांची चित्रपट कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटमुळे शाहरुखची संपत्ती वाढण्यात हातभार लागला आहे. शाहरुखच्या कंपनीने आर्थिक वर्षे 2023 मध्ये 85 कोटींचा शुद्ध नफा कमावला. तसेच शाहरुखचा चित्रपट जवान देशात 640.25 कोटी रुपये तर जगभरात 1,160 कोटींची कमाई केली.त्यामुळे शाहरुखच्या संपत्तीत वाढ झाली.

कॉलेज ड्राप आऊट

अलख पांडे हा कॉलेज ड्राप आऊट आहे. कानपूरच्या Harcourt Butler कॉलेजमधून तो बीटेक करत होता. तिसऱ्या वर्षी त्याने कॉलेज सोडले आणि कानपूर सोडून प्रयागराज गाठले. तेथे त्या कोचिंगक्लासमध्ये शिकवणे सुरु केले. त्याला नंतर तेथून काढण्यात आले. त्यानंतर त्याने घरातील युट्युब चॅनलवरुन फिजिक्सवर लेक्चर देणे सुरु केले.त्यानंतर 2020 मध्ये त्याने IIT BHU मधून शिकलेल्या प्रतिक माहेश्वरी सोबत फिजिक्सवाला क्लासचे रजिस्ट्रेशन केले आणि स्वत:चे ऐप काढले. नंतर संपूर्ण भारतात फिजिक्सवाला कोंचिग प्रसिद्ध झाला असून आता त्याचा आयपीओ देखील येणार आहे.