-
आजचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जग एका मोबाईलमध्ये सामावले आहे. इंटरनेट, मोबाईलमुळे जगणं सोपं झालेलं असलं तरी आजघडीला यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
-
आज अनेक तरुण तासनतास मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात. यामुळे मात्र डिप्रेशमध्ये जाण्याचे प्रमाण फार वाढले आहे. अनेकांना तर आपण डिप्रेशनमध्ये गेलो आहोत, हे समजतही नाही.
-
मोबाईल पाहिल्यामुळे अनेकांना झोप लागत नाहीत. झोप कमी होते. झोप न झाल्याने मुड स्विंग, चिडचिड व्हायला लागते. कालांतराने निद्रानाशाचा हा त्रास डिप्रेशनचे कारण बानतो.
-
डिजिटल युगात राहण्याची सवय झाल्यामुळे तरुण-तरुण संवाद कमी करतात. परिणामी मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पुढे-पुढे हीच बाब डिप्रेशनचे कारण ठरते. त्यामुळे डिजिटल युगात वावरत असताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
-
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)