
शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यातून कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर शुबमन ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वनडे कॅप्टन म्हणून डेब्यू करणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं पुनरागमन होणार आहे. या जोडीने टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघासाठी एकदिवसीय सामना खेळणार आहेत. त्यामुळे या जोडीच्या कमबॅकची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. या मालिकेला रविवारी 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात वनडे सीरिजमधील पहिला सामना हा पर्थमध्ये होणार आहे. या मैदानातील रोहितची आकडेवारी कमालीची आहे. रोहितने या मैदानात खोऱ्याने धावा केल्या आहेत. या निमित्ताने रोहितने पर्थमध्ये किती धावा केल्या आहेत? हे जाणून घेऊयात.