
टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा कसोटी मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर आता वेस्ट इंडिज बांगलादेश दौऱ्यात वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. वेस्ट इंडिजने या दोन्ही मालिकांसाठी 14 ऑक्टोबरला संघ जाहीर केला. त्यानंतर आता गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी यजमान बांगलादेशने विंडीज विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. मेहदी हसन मिराज या मालिकेत बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे.
उभयसंघात शनिवारपासून अर्थात 18 ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. बांगलादेशचा याआधी अफगाणिस्तानने वनडे सीरिजमध्ये 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. बांगलादेशच्या या मालिका पराभवानंतर वेस्ट इंडिज विरूद्धच्या सीरिजसाठी 2 बदल करणयात आले आहेत. तसेच महिदुल इस्लाम अंकोन याला पहिल्यांदाच एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे.
कुणाला संधी?
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ओपनर मोहम्मद नईम याला वगळलं आहे. तसेच वेगवान गोलंदाज नाहिद राणा यालाही संधी देण्यात आलेली नाही. तर सौम्य सरकारचं कमबॅक झालं आहे. टी 20I कॅप्टन लिटन दास याला दुखापतीमुळे विंडीज विरूद्धच्या मालिकेला मुकावं लागलं आहे. लिटनला आशिया कप 2025 स्पर्धेत दुखापत झाली होती. लिटनला या दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेलाही मुकावं लागलं होतं.
बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 18 ऑक्टोबर, ढाका
दुसरा सामना, 21 ऑक्टोबर, ढाका
तिसरा सामना, 23 ऑक्टोबर, ढाका
एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशचा संघ
Dutch-Bangla Bank Bangladesh
West Indies Cricket Series 2025 | ODI Squad
The Bangladesh Cricket Board (BCB) has announced the squad for the three-match ODI series against the West Indies.
Bangladesh ODI Squad:
Mehidy Hasan Miraz (Captain)
Tanzid Hasan Tamim
Soumya… pic.twitter.com/jQO7oeXdJZ— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 16, 2025
वेस्ट इंडिज विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी बांगालादेश टीम : मेहदी हसन मिराज (कॅप्टन), तंजीद हसन तमीम, सौम्या सरकार, मोहम्मद सैफ हसन, नजमुल हुसैन शांतो, तौहीद हृदोय, महिदुल इस्लाम अंकोन, जाकेर अली, तनवीर इस्लाम, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शमीम हुसैन, तंजीम हसन साकिब काजी नुरुल हसन सोहन, रिशाद हुसैन आणि हसन महमूद.