
वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेची विजयाने सुरुवात केली आहे. टीम इंडियाने गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने श्रीलंकेला 270 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेने गुडघे टेकले. टीम इंडियाने श्रीलंकेला 45.4 ओव्हरमध्ये 211 ऑलआऊट केलं. भारताने यासह डीएलएसनुसार 59 धावांनी हा सामना जिंकला. अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा या दोघींनी बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान देत भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर इतरांनीही आपलं योगदान दिलं.