WI vs NEP : विंडीजचा 10 विकेट्सने विजय, अंतिम सामन्यात दोन्ही पराभवांचा हिशोब, नेपाळला हॅटट्रिकपासून रोखलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 1, 2025

WI vs NEP : विंडीजचा 10 विकेट्सने विजय, अंतिम सामन्यात दोन्ही पराभवांचा हिशोब, नेपाळला हॅटट्रिकपासून रोखलं

WI vs NEP : विंडीजचा 10 विकेट्सने विजय, अंतिम सामन्यात दोन्ही पराभवांचा हिशोब, नेपाळला हॅटट्रिकपासून रोखलं

वेस्ट इंडिज टीमने नेपाळ विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात दणदणीत विजय मिळवत पहिल्या 2 पराभवांची अचूत परतफेड केली आहे. नेपाळने विंडीजला विजयसाठी 123 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडीजच्या सलामी जोडीनेच हे आव्हान तुफानी बॅटिंगच्या जोरावर पूर्ण केलं. विंडीजने हे आव्हान 46 बॉलआधीच पूर्ण केलं. विंडीजने 12.2 ओव्हरमध्ये 123 धावा केल्या आणि नेपाळ विरुद्ध यशस्वीरित्या क्लिन स्वीप टाळला. नेपाळने ही मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली.

विंडीजसाठी अमीर जांगू आणि अकीम ऑगस्टे या सलामी जोडीने नेपाळच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत पहिल्या 2 पराभवांचा राग काढला. या दोघांनी मैदानात बेछूट आणि चौफेर फटकेबाजी केली. विंडीजसाठी अमिरने सर्वाधिक धावा केल्या. अमिरने 45 बॉलमध्ये 164.44 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 74 रन्स केल्या.

अमिरने 11 बॉलमध्ये फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 56 रन्स केल्या. अमिरने या खेळीत 6 गगनचुंबी षटकार आणि 5 चौकार लगावले. तर अकीमने 29 बॉलमध्ये 141.38 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 41 रन्स केल्या. अकीमने या खेळीत 4 फोर आणि 2 सिक्स लगावले.