Kalyan Crime : मोबाईल हॅक करून बनवले अश्लील व्हिडीओ, ब्लॅकमेल करत प्रियकराकडूनच अत्याचार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 18, 2025

Kalyan Crime : मोबाईल हॅक करून बनवले अश्लील व्हिडीओ, ब्लॅकमेल करत प्रियकराकडूनच अत्याचार

Kalyan Crime : मोबाईल हॅक करून बनवले अश्लील व्हिडीओ, ब्लॅकमेल करत प्रियकराकडूनच अत्याचार

कधी खून, कधी मारामारी तर कधी दरोडा… राज्यात गुन्ह्यांच्या नवनव्या घटना रोज समोर येत असून मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याणमध्येही एक धक्कादायक गुन्हा घडल्याचे उघडकीस आले आहे. तिथे एका 29 वर्षांच्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून प्रियकरानेच तिच्यवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. आरोपी प्रियकराने तिच्यावर केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडित तरुणीचा मोबाईल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवली आणि तिचे अश्लील व्हिडीओ बनवले. त्याची क्रूरता एवढ्यावरच थांबली नाही तर त्याने पीडित तरूणीच्या कुटुंबियांनाबी धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

आरोपी तरूणाच्या मोबाईलमध्ये साठवलेले अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर, या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.  या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून त्यामुळे पोलिसांवर दबाव असल्याने तो अजूनही फरार आहे, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे

खासगी व्हिडीओ केले रेकॉर्ड, नंतर ब्लॅकमेलिंगही…

खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. लग्नाचं आमिष दाखवत आरोपीने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. या दरम्यान त्याने तिचे गुप्त व्हिडिओ रेकॉर्ड केले. याच काळात आरोपीने तरुणीचा मोबाईल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर त्या तरुणीच्या आई-वडील आणि भावाला धमक्या देऊन ब्लॅकमेल केलं. आरोपीकडून सतत दबाव येत असताना, एके दिवशी आरोपीचा मोबाईल तरुणीच्या हाती लागला. त्यात तिचेच नव्हे, तर इतर मुलींचेही अश्लील व्हिडिओ सापडले.

तरूणीवरच केला चोरीचा आरोप

हे व्हिडिओ पाहून तरुणी हादरली पण तिने त्याचा मोबाईल आपल्याकडे ठेवला. ही बाब उघड झाल्यानंतर आरोपीने आपला मोबाईल पुन्हा मिळवण्यासाठी तरुणीच्या आई-वडिलांना आणि भावांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आपले राजकीय बळ वापरत पोलिसांकडे जाऊन उलट तरुणीवर मोबाईल चोरीचा आरोप केला. मात्र पोलिसांनी तरुणीची विचारपूस केल्यानंतर सत्य समोर आलं. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती आरोपीच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ लागले.

यानंतर पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात आरोपी हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झाल्याचं कळताच तोफरार झाला असून खडकपाडा पोलिसांचा शोधमोहीम सुरू आहे. मात्र या घटनेमुळे कल्याण शहरात खळबळ उडाली असून, खडकपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.