-
तंत्रज्ञानातील प्रगती, शिक्षणासाठी मिळत असलेली संधी यामुळे महिला गुंतवणुकीच्या बाबतीत अधिक सजग होताना पाहायला मिळत आहेत. सध्या बचत आणि गुंतवणुकीच्या अशा काही खास योजना आहेत, ज्यांच्या माध्यमातून महिला चांगला परतावा मिळवू शकतात.
-
पोस्ट ऑफिसची एक महिला सन्मान बचत योजना आहे. या योजनेला 2023 साली सुरुवात झाली होती. ही फक्त महिलांसाठीची योजना आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी महिलांना या योजनेत गुंतवणूक करता येते.
-
महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत महिलांना चांगला परतावा मिळतो. तसेच परताव्याची हमीदेखील मिळते. सुकन्या समृद्धी योजना अशाच एका योजनेचे नाव आहे. मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना राबवली जाते.
-
ज्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे, असा मुलींसाठी या योजनेत गुंतवणूक करता येते. ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेअंतर्गत 8.2 टक्के व्याज मिळते. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यास मिळालेल्या परताव्यावर व्याजदेखील भरावे लागत नाही.
-
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)