-
बिग बॉस 19 फेम तान्या मित्तल तिच्या आलिशान जीवनशैलीसाठी खूप चर्चेत आहे. तसेच तिच्या सुंदर साड्यांच्या कलेक्शनबद्दलही नेहमीच चर्चा होताना दिसते. पण तिच्या दागिन्यांचे कलेक्शन देखील तेवढेच सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.
-
या फोटोत तान्या मित्तलने घातलेला मणी आणि हिऱ्यांनी जडलेला हार तिच्या कलेक्शनमधील एक सुंदर पीस आहे. या हाराचे चार ते पाच लेअर आहेत. ज्यामुळे तो घातल्याने एक आकर्षक लूक मिळतो. हाराचे लेअर मणी आणि मॅचिंग स्टड इअररिंग्जसोबत आहे. साडीपासून लेहेंग्यापर्यंत कोणत्याही पोशाखावर तो सुंदर दिसेल.
-
तान्या मित्तलला मोती आणि मणी खूप आवडतात. तिने तिच्या काळ्या ऑर्गन्झा साडीवर घातलेला मोत्याच्या हार देखील फार वेगळ्या डिझाईनचा आहे. या हारातही एकूण पाच लेअर आहेत. पार्टीवेअर साडीसोबत असे मोत्याचे हार फार उठून दिसतात.तान्याने या नेकलेससोबत स्टड इयररिंग्ज देखील घातले आहेत जे तिच्या लूकला पूर्ण करतात.
-
तान्या मित्तलने या ड्रेसवर घातलेला हा हार पाश्चात्य आणि पारंपारिक दोन्ही पोशाखांसह सुंदर दिसेल. या नेकलेसमध्ये अंडाकृती आकाराचे एक ब्राऊन रंगाचा डायमंड असलेले पेंडंट आहे जे फारच उठून दिसत आहे. कोणत्याही वेस्टन ड्रेसवर या डिझाईनचा हा नेकलेस नक्कीच सुंदर दिसेल. त्याचपद्धतीचे कानातले तिने घातले आहेत.
-
तान्या मित्तल चोकर सेटही फार हटके आहे. चोकर सेट्स आजकाल खूपच ट्रेंडमध्ये आहे. तान्या मित्तलने जांभळ्या साडीसोबत घातलेला हा चोकर सेट देखील तिच्या दागिन्यांमधलं एक सुंदर कलेक्शन आहे. या चोकर सेटमध्ये मणी, जेमस्टोन आणि एमराल्डचे परफेक्ट डिटेलिंग आहे. तसेच या चोकरच्या सेटसोबत असणारे कानातले देखील तिने घातले आहेत ज्यामुळे तिचा साडीचा लूक पूर्ण होत आहे.
-
या फोटोमध्ये, तान्या मित्तलने नवरत्न हार घातलेला दिसत आहे, ज्यामध्ये नऊ मल्टीकलर रत्न आणि या नेकलेसला गोल्डन टच देखील आहे. या हाराला साजेसे कानातले देखील आहेत. साडी किंवा लेहेंग्यासोबत हा हार खूपच सुंदर दिसेल.
-
तान्या मित्तलचा हा मल्टी-स्ट्रँड नेकलेस खूपच सुंदर दिसतोय. त्यात पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे स्टोन आहेत. तसेच मणी आणि मोत्याचे डिटेलिंग आहे. तुम्ही हा नेकलेस कोणत्याही रंगाच्या पोशाखासोबत घालू शकता.






