
पंजाबच्या लुधियानामधील जगरांव येथे शुक्रवारी (31 ऑक्टोबर) धक्कादायक घटना घडली. येथे एका कबड्डी प्लेयवर दिवसाढवळ्या गोळ्या घालण्यात आल्या. तेजपाल सिंग असे हत्या झालेल्या कबड्डीपटूचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार जगरांव येथील हरी सिंह रुग्णायय रोडवर हे हत्याकांड घडून आले आहे. विशेष म्हणजे कबड्डीपटूवर एसएसपी ऑफिसच्या अगदी 200 मीटर अंतरावर हे हत्याकांड घडून आले आहे. मृत्यू झालेल्या कबड्डीपटूचे वय 26 वर्षे आहे.
कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार तेजपाल सिंह अपल्या दोन मित्रासोबत हरि सिंह रोडवर असलेल्या एका कंपनीच्या जवळ जात होते. यावेळी जुन्या वादातून त्यांच्यावर हे गोळ्या झाडण्यात आल्या. अगोदर तेजपाल तसेच समोरच्या गटात वाद झाला. हा वाद नंतर वाढतच गेला. त्यानंतर सोमरच्या गटातील एका व्यक्तीने तेजपालच्या छातीवर पिस्तूल धरत गोळीबार केला. गोळीबारानंतर तेजपाल यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पार्किंगमध्ये कार धडकली अन्…
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी चालू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हल्लेखोर हा जगरांव गावाजवळील रुमी या गावातील रहिवासी आहे. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस घटनास्थळाच्या आसपास असणारे सीसीटीव्ही तपासत आहे. हल्लेखोर दोन वाहनांमध्ये बसून आल्याचे बोलले जात आहे. तर कबड्डीपटू तेजपाल आपल्या कारमध्ये बसून जात होता. पार्किंगमध्ये तेजपाल यांची कार आणि आरोपीच्या वाहनाला धडकली. त्यानंतर वाद चालू झाला.
वीस मिनटे मारलं, नंतर घातली गोळी
तेजपाल यांची कार समोरच्या कारला धडकल्यानंतर दोन कारमधून एकूण सात ते आठ तरुण बाहेर आले. त्यांनी कबड्डीपटू तेजपाल यांना मारण्यास सुरुवात केली. साधारण वीस मिनिटे ते कबड्डीपटूला मारत होते. त्यानंतर यातीलच एका तरुणाने पिस्तूल काढून तेजपाल यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर सगळेच घटनास्थळाहून पळून गेले. मृत कबड्डीपू तेजपाल जिल्हा स्तरीय सामने खेळलेला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपींची ओळख पटेली असून त्यांचा शोध चालू आहे.