-
छत्तीसगडमध्ये जशपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण 2022 सालातील असले तरीही यातील मुख्य आरोपीला गुरुवारी (13 नोव्हेंबर) बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या धक्कादायक प्रकरणाची आता देशभरात चर्चा होत आहे.
-
या प्रकरणी 9 एप्रिल 2022 रोजी जशपूर यथील दुलदुला येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत अल्पवयीन मुलीला 2021 सालापासून फसवण्यात आल्याचे नमूद होते बिहारच्या पटण्यातील कुंदन राज नावाच्या आरोपीने अल्पवयीन मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे.
-
त्याने या मुलीला फेसबुकवर शोधले. स्वतला मी खूप सुंदर दिसतो, असे भासवत या मुलीला फसवले. हात कापलेला फोटो पाठवून मुलीला जाळ्यात ओढले आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लग्न केले. त्यानंतर सुहागरात्र म्हणून ऑनलाईन व्हिडीओ कॉल करायला लावला आणि अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडीओ तयार केले. पुढे याच व्हिडीओच्या मदतीने कुंदन राज याने या पीडित मुलीला फसवले.
-
तुझे व्हिडीओ व्हायरल करतो, अशी धमकी देत सध्या मी बाहेर आहे. त्यामुळे मी माझ्या मित्राला पाठवत आहे. त्याच्यासोबत तू एक रात्र काढ नाहीतर तुझे व्हिडीओ व्हायरल करतो, अशी धमकी कुंदन राजने पीडित अल्पवयीन मुलीला दिला. त्यानंतर कुंदनचा मित्र दिलीप चौहान हा दुलदुला येथे गेले.
-
त्याने पीडित मुलीला दीपक यादव असे खोटे नाव सांगून तिच्यासोबत दुष्कृत्य केले. तिकडे कुंदन राज व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून हे दुष्कर्म पाहात होता. हाच व्हिडीओ कुंदन राजने पीडित मुलीच्या बहिणीला पाठवला. त्यानंतर पीडित मुलीने हिंमत दाखवून घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि कुंदन राजचा खरा चेहरा समोर आला. या घटनेबाबत 2022 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु आता या प्रकरणातील मुख्य आरोपी कुंदन राज याला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.




