
श्रीलंका क्रिकेट टीम लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर जाणर आहे. श्रीलंका या पाकिस्तान दौऱ्यात यजमान संघाविरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहे. श्रीलंकेने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. चरिथ असलंका श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेला मंगळवार 11 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
पाकिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम :
चरिथ असलंका (कॅप्टन), पथुम निसंका, लहिरू उदारा, कमिल मिशारा, कुसल मेंडीस, सदीरा समरविक्रमा, दुश्मंथा चमीरा, असिथा फर्नांडो, प्रमोद मदुशन, कमिंदु मेंडिस, जनिथ लियानागे, पवन रत्नायके, वानिंदु हसरंगा, महीश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि एशान मलिंगा.