
राज्यात 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे.23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. 20 डिंसेंबरला त्या 23 नगरपालिकांचे मतदान पार पडले. आता आज 2 डिसेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा आहेत. आजच्या निकालाचे वेगवान अपडेट्स तुम्ही tv9 वेबसाईटवर पाहू शकता. झटपट निकाल आपल्याला बघायला मिळतील. प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल आपल्याला समजतील. मतदान प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली असून आज निकाल असल्याने मोठा बंदोबस्त प्रशासनाकडून ठेवण्यात आला. अगदी काही वेळातच निवडणुकीच्या निकालाला सुरूवात होईल. या निवडणुकीकडे फक्त राज्याच्याच नजरा नाही तर देशाच्या आहेत. काही ठिकाणी युती म्हणून पक्ष लढले तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे या निवडणुका लढण्यात आल्या.