Shafali Verma : शफाली वर्माची रेकॉर्ड ब्रेक खेळी, स्मृती मंधानाला पछाडलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 24, 2025

Shafali Verma : शफाली वर्माची रेकॉर्ड ब्रेक खेळी, स्मृती मंधानाला पछाडलं

Shafali Verma : शफाली वर्माची रेकॉर्ड ब्रेक खेळी, स्मृती मंधानाला पछाडलं

वुमन्स टीम इंडियाने कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात विशाखापट्टणममध्ये 23 डिसेंबर झालेल्या दुसऱ्या टी 20I सामन्यात श्रीलंकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने शफाली वर्मा हीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 129 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. भारताने 11.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स सलग दुसरा विजय मिळवला. भारताने विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली. शफालीने या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. शफालीने 34 बॉलमध्ये 203 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 69 रन्स केल्या. शफालीने त्यापैकी 46 धावा या 10 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने केल्या. शफालीला तिच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. शफालीने यासह टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीला पछाडलं.

शफालीने स्मृतीला पछाडलं

शफालीने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकताच (POTM) स्मृतीला पछाडलं. शफालीने पोओटीम अवॉर्ड जिंकण्याबाबत स्मृतीला मागे टाकलं. शफाली टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरली. शफालीची सामनावीर होण्याची ही आठवी वेळ ठरली. तर भारतासाठी सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याचा विक्रम हा माजी कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हीच्या नावावर आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच स्मृतीव्यतिरिक्त ऑलराउंडर दीप्ती शर्मा आणि जेमीमाह रॉड्रिग्स यांनीही प्रत्येकी 7-7 वेळा हा पुरस्कार पटकावला आहे.

भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक POTM पुरस्कार विजेते खेळाडू

स्मृती मंधाना : 7

दीप्ती शर्मा : 7

जेमीमाह रॉड्रिग्स : 7

शफाली वर्मा : 8

हरमनप्रीत कौर : 11

मिताली राज : 12