Horoscope Today 24th March 2026 : संकटांचा काळ पडला मागे, मंगळवार घेऊन आला नवी संधी.. मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस खास, वाचा तुमचं भविष्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 24, 2026

Horoscope Today 24th March 2026 : संकटांचा काळ पडला मागे, मंगळवार घेऊन आला नवी संधी.. मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस खास, वाचा तुमचं भविष्य

Horoscope Today 24th March 2026 : संकटांचा काळ पडला मागे, मंगळवार घेऊन आला नवी संधी.. मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस खास, वाचा तुमचं भविष्य

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 24th March 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आज तुम्ही तुमचा बहुतेक दिवस प्रवासात जाईल. कुटुंबातील जवळचे नातेवाईक आज तुम्हाला भेटायला येऊ शकतात. एखाद्या जवळच्या मित्राचीही अचानक भेट होईईल, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. आधीचे अपयश धुवून चांगलं यश मिळेल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्या कुटुंबासाठी नवीन आनंद घेऊन येत आहे. आज कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही विचारपूर्वक वागले पाहिजे. तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल. डोळ्यांच्या समस्यांसाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावासा वाटू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आज नव्या नोकरीची, मोठ्या पगाराच्या कामाची ऑफर मिळेल, नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला कामात हमखास यश मिळेल. आजचा दिवस तुमच्या कामात आनंद घेऊन येईल. डॉक्टरांना त्यांच्या वरिष्ठांकडून महत्त्वाची माहिती मिळेल. या राशीत जन्मलेल्या अभियंत्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आज तुम्ही मित्रांसोबत बाहेर जेवण्याचे प्लान आखाला. राजकारणात गुंतलेल्या व्यक्तींनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. आज तुम्ही नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल कराल. आज तुमचे आरोग्य सामान्य राहील.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

व्यवसायात अनुकूल परिस्थिती कायम राहील. आज तुम्हाला वडीलधाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवाल. आज तुम्हाला वाहन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदार एकमेकांच्या भावनांचा आदर करतील.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. आज व्यावसायिक सौदे अंतिम होतील. आज तुम्ही नवीन ग्राहकांना भेटाल. अविवाहित जोडपी लवकरच त्यांचे नातेसंबंध दृढ करतील. तुम्ही मित्रांसोबत काही आनंदाचे क्षण घालवाल. कोणाच्यातरी मदतीचा तुम्हाला फायदा होईल.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आज, तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामाची आखलेली योजना यशस्वीपणे पूर्ण कराल. जे नोकरीत आहेत ते त्यांना नेमून दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळेल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल आणि तुम्ही आयुष्य पुरेपूर जगाल. या राशीत जन्मलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची हुशारीने तयारी करावी. तुम्ही तुमच्या पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आजचा दिवस मनासारखा जाईल. तुमचा एखादा जुना मित्र तुमच्याकडे आर्थिक मदत मागू शकतो. तुम्ही त्याला किंवा तिला निराश करणार नाही आणि तुमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम मदत कराल. पण उधारा देताना जपून रहा. आज ऑफीसच्या कामात यशाचा एक नवीन संधी दिसेल. जर तुम्ही काही काळापासून वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्यासारखा छान दिवस नाही.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आज तुम्ही फॅक्टरीसाठी यंत्र खरेदी करण्याचा विचार करू शकता. कुटुंबियांमध्ये प्रेम वाढेल. तुमच्या जोडीदाराला अपेक्षित भेटवस्तू मिळेल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तांत्रिक शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

तुम्हाला तुमच्या मुलांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमचे नातेसंबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील. या राशीच्या व्यक्तींचे प्रकल्प लवकरच पूर्ण होतील आणि लोक तुमच्या कामावर खूश होतील. आज तुम्हाला पदोन्नतीची बातमी मिळू शकते. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सुधारतील.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

आज तुम्ही पाहुण्यांच्या आगमनाच्या तयारीत बिझी असाल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. स्थापत्य अभियंते आज त्यांचे पूर्वीचे प्रकल्प पूर्ण करतील. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या कामात मदत करेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)