IPL 2026, RR vs CSK : राजस्थान चेन्नई सामन्यात काय घडलं? एका क्लिकवर सर्वकाही जाणून घ्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 31, 2026

IPL 2026, RR vs CSK : राजस्थान चेन्नई सामन्यात काय घडलं? एका क्लिकवर सर्वकाही जाणून घ्या

IPL 2026, RR vs CSK : राजस्थान चेन्नई सामन्यात काय घडलं? एका क्लिकवर सर्वकाही जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंगस आमनेसामने आले होते. या सामन्यावर पूर्णपणे राजस्थान रॉयल्सचं वर्चस्व दिसून आलं. सुरूवातीला चेन्नई सुपर किंग्ससला 127 धावांवर रोखलं. चेन्नईचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजांसमोर अक्षरश: हतबल दिसले. एकाही फलंदाजाला साजेशी काम करता आली नाही. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे गोलंदाज हतबल दिसले. कारण राजस्थानच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांना धू धू धुतलं. त्यात सुमार क्षेत्ररक्षणामुळे वैभव सूर्यवंशी भारी पडला. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. तसेच या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतकाची नोंद केली. राजस्थान रॉयल्सने 8 गडी राखून चेन्नई सुपर किंग्सला नमवलं. चला या सामन्यात कोणते रेकॉर्ड नोंदवले गेले जाणून घेऊयात

चेन्नई सुपर किंग्सचा राजस्थान रॉयल्सविरुद्ध तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने 109 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2020 मध्ये 125, 2026 मध्ये 127 आणि 2014 मध्ये 140 धावा केल्या होत्या.

आयपीएल स्पर्धेत दहाव्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावांची भागीदारी नोंदवली गेली. 2023 मध्ये पंजाब किंग्ससाठी खेळताना शिखऱ धवन आणि एम राठीने नाबाद 55 भागीदारी, हैदराबादच्या पॅट कमिन्स आणि व्यासकांतने 2024 मध्ये 33 धावांची भागीदारी, आता जेमी ओव्हरटोन आणि अंशुल कंबोजने 33 धावांची भागीदारी केली.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सने आयपीएल इतिहासात 16वा विजय मिळवला. यासह चेन्नईविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघाच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सने प्रत्येकी 16वेळा विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्सने 21 वेळा विजय मिळवला आहे.

120 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना कमी षटकं खेळल्याने राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर आहे. 166 धावांचा पाठलाग करताना हैदराबादने 9.4 षटकं, 125 धावांचा पाठलाग करताना पंजाबने 11.1 षटकं, 155 धावांचा पाठलाग करताना डेक्कने 12 षटकं आणि 127 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने 12.1 षटकं घेतली.

आयपीएलमध्ये 47 चेंडू शिल्लक असताना मिळालेला विजय हा राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात मोठा विजय आहे. तर गेल्या वर्षी चेपॉकमध्ये केकेआरविरुद्ध 59 चेंडूंनी झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जसाठी हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे.