SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी या तारखेला होणार प्रसिद्ध - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 5, 2026

SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी या तारखेला होणार प्रसिद्ध

SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी या तारखेला होणार प्रसिद्ध

राज्यातील SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. अंतिम मुदत 17 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्व प्रक्रियेनंतर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना प्रारूप मतदार यादींवर २३ सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे-हरकतींवर नोटिसा बजावणे, किंवा सुनावणी घेणे आणि त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव आणि मतदार यादीतील तपशील तपासण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांना आवाहन करण्यात आलं आहे.

(बातमी अपडेट होत आहे)