'त्या' सीनमुळे फरहान अख्तर सेन्सॉरवर नाराज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 15, 2019

'त्या' सीनमुळे फरहान अख्तर सेन्सॉरवर नाराज

https://ift.tt/2q5tm7q
मुंबई: सध्या एका सिनेमामुळे चर्चेत आहे. हॉलिवूडपट '' हा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वीच या सिनेमामधील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डानं कात्री लावली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या काटछाटवर फरहान नाराज असून सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर तो व्यक्त झालाय. 'फोर्ड वर्सेस फरारी' या हॉलिवूडपटातील मद्यपानाची काही दृश्यं ब्लर तर इतर काही दृश्य संवादहीन करण्यात आली आहेत. यामुळे नाराज झालेल्या फरहानने ट्विट करत लिहिलंय की, 'तो दिवस दूर नाही जेव्हा ही मंडळी चित्रपटगृहात फक्त स्क्रिप्ट वाचायला परवानगी देतील. भारतातील १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीला अपराधीपणाची भावना आणणारी वागणूक का दिली जाते हे मला समजत नाही. ही व्यक्ती स्वत: साठी विचारच करू शकत नाही, स्वत:साठी काय योग्य, काय अयोग्य हे ठरवूच शकत नाही असं आपण का गृहीत धरतो हे माझ्या समजण्यापलीकडे आहे.' असं त्यानं लिहिलंय. फरहानने ट्वीट करुन आगपाखड केल्यानंतर अनेक भारतीय नेटकऱ्यांनीदेखील त्यांचा संताप व्यक्त केला. 'सेन्सॉर बोर्ड असं कसं वागू शकते?', 'आम्ही काय बघणं योग्य किंवा अयोग्य हे सेन्सॉर बोर्ड कसं काय ठरवणार?' असे सवालही अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. 'फोर्ड वर्सेस फरारी' या हॉलिवूडपटातील मद्यपानाची काही दृश्यं ब्लर करण्यामागील खरं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्याच्या बाटलीवरील ब्रँडचे नाव दिसू नये म्हणून ते दृश्य ब्लर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, फरहानच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर सध्या चर्चा आहे ती त्याच्या लग्नाची...अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर याचं नातं आता काही लपून राहिलं नाहीये. बॉलिवूडमधील पार्टी असो किंवा एखादा कार्यक्रम असो सगळीकडे दोघं जोडीने हजेरी लावतात. लवकरच हे लव्हबर्ड्स लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. शिबानी आणि फरहान फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत लग्न करण्याचा विचार करत आहेत. शिबानीचं फरहानच्या मुलांसोबतही अगदी घट्ट नातं निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वीच फरहानच्या मुलांनी त्यांच्या नात्याला हिरवा कंदील दिला आहे. फरहानच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळं मध्यंतरी शिबानी आणि फरहाननं गुपचूप साखरपुडा उरकल्याचीही चर्चा होती.