
आता भारत चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर 24 तास बारीक लक्ष ठेऊ शकणार आहे. पाऊस, वारा कोणतेही तूफान आले तरीही भारताला कोणीच रोखू शकत नाही. भारताला मोठे यश मिळाले. भारताने अंतराळातून आपल्या सीमेवर पाळत ठेवण्यासाठी नव्या युगाची सुरूवात केली. इस्रोने (ISRO) आपले पहिले इमेजिंग उपग्रह EOS-05 प्रक्षेपित पहाटेच केले. हा भारताचा मोठा विजय असणार आहे. हा उपग्रह देशातील विविध भागांवर सर्वात महत्वाचे म्हणजे पाकिस्तान आणि चीन यासारख्या देशांच्या सीमेवर अंतराळातून नजर ठेवेल. हे एक भारतासाठी महत्वाचे क्षेत्र म्हणावे लागेल. ज्यामुळे भारताची सुरक्षा अधिक मजबूत होईल, शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर भारत बारिक नजर ठेऊ शकणार आहे. नवीन EOS-05 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखे तो नजर ठेवेल.
हा भारताचा अत्यंत मोठा विजय म्हणावा लागेल. भारत आपल्या सीमेंवर अंतराळातून लक्ष ठेऊ शकणार आहे. माहितीनुसार, GSLV-F17 हे रॉकेट 4 सप्टेंबर रोजी रात्री श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले गेले. GSLV रॉकेटची ही 19 वी मोहीम असेल. जानेवारीमधील PSLV-C62\EOS-N1 मिशननंतर इस्त्रोनो कोणतेही रॉकेट लॉन्च केले नव्हते.
जीएसएलवी-एफ17\ईओएस-05 मिशन 27 तास बुधवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू झाले. 51.7 मीटर लांब रॉकेट 4 सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजून 55 मिनिटांनी चेन्नई 135 किलोमीटर दूर धवन केंद्र दूरवरून लॉन्च करण्यात आले. भारताचे बहुतेक उपग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून प्रदक्षिणा घालतात. ते सतत पृथ्वीभोवती फिरत असतात. एखाद्या विशिष्ट भागाचा फोटो काढल्यानंतर उपग्रह पुढे सरकतो.
काही दिवसांनी त्याच ठिकाणाचे पुन्हा फोटो पाठवले जातात. पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर उंचीवर स्थापित केला जाईल. या उंचीवर असताना हा उपग्रह पृथ्वीसोबत संपर्क ठेऊन प्रदक्षिता घालेल. भारत आणि आसपासचा परिसर सतत त्याच्या कॅमेऱ्यांच्या नजरेत राहील. तो परिसरावर बारीक लक्ष ठेऊन असेल. ज्यामुळे सीमेवरील प्रत्येक हालचालीवर बारीक नजर राहण्यास मदत होईल. हा भारताचा मोठा विजय म्हणावा लागेल.