पबजी: घर सोडलेला नेरुळचा मुलगा कोलकात्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 28, 2019

पबजी: घर सोडलेला नेरुळचा मुलगा कोलकात्यात

https://ift.tt/2lVSSda
नवी मुंबई: पबजीच्या व्यसनापायी नेरुळमधून घर सोडून गेलेला मुलगा कोलकात्यात सापडला. हा १६ वर्षीय मुलगा १६ सप्टेंबर रोजी घरातून बेपत्ता झाला होता. आयुष चुडजी असं त्याचं नाव आहे. कोलकात्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी तो गेल्याची प्राथमिक माहिती आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जापवार यांनी माहिती दिली की, एन्टाली पोलिसांनी एनआरएस मेडिकल कॉलेज परिसरातून गुरुवारी या मुलाला ताब्यात घेतले. त्यांनी या मुलाला तो हरवला असल्याबाबत विचारले तेव्हा तो रडू लागला आणि त्याने घरातून पळून आल्याचे मान्य केले. कॉलेज विद्यार्थी असलेल्या आयुषकडे घरी येण्यासाठी पैसे नव्हते. त्याने पोलिसांकडे मदत मागितल्यावर पोलिसांनी त्याच्या आईशी संपर्क साधला. पोलिसांनी त्याला बालकल्याण समितीकडे पाठवले. मुलाचे काका आणि एक हेड कॉन्स्टेबर येथून कोलकात्याला रवाना झाले आहेत. ते रविवार सकाळपर्यंत तेथे पोहोचतील.