नाशिक: विजेच्या धक्क्याने दोघींचा मृत्यू, २ गंभीर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 29, 2019

नाशिक: विजेच्या धक्क्याने दोघींचा मृत्यू, २ गंभीर

https://ift.tt/2oia1hV
नाशिक: शिवपूरी चौकातील उत्तम नगर येथे विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विजेच्या धक्क्याने नागरिकांता मृत्यू झाल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. सोजाबाी मोतीराम केदारे (८०) आणि सिंधुताई शांताराम केदारे (४०) अशी मृत्यूमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. तर नंदिनी शाताराम केदारे (२३) आणि शुभम शांताराम केदारे (१९) अशी गंभीर झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको केला. घरांना अडथळा ठरणाऱ्या विजेच्या तारा त्वरीत हटवाव्यात अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी स्थानिकांची आग्रही मागणी आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची नावे: >> सोजाबाई मोतीराम केदारे- वय- ८० >> सिंधुबाई शांताराम केदारे- वय- ४० गंभीर जखमींची नावे: >> नंदिनी शांताराम केदारे- वय- २३ >> शुभम शांताराम केदारे- वय-१९