युतीचं जागावाटप ठरणार? भाजपची आज दिल्लीत बैठक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 29, 2019

युतीचं जागावाटप ठरणार? भाजपची आज दिल्लीत बैठक

https://ift.tt/2o9PKef
मुंबई/नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार असल्याचं दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. मात्र, तशी अधिकृत घोषणा झालेली नाही. नवी दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. त्यात युतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीनंतर कदाचित भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते, असं सूत्रांकडून समजते. राज्यात विधानसभा निवडणुकीचं रण तापलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप भाजप-शिवसेना युती जागावाटपावर अडलेली आहे. दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यात भाजपची युतीबाबतची भूमिका स्पष्ट होईल. शिवसेनेसोबतच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रासह हरयाणातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या यादीवर अंतिम निर्णय होईल, असंही सांगण्यात आलं. नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात ही बैठक होईल. पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री , चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आदी नेतेही उपस्थित राहणार आहेत, असं समजतं. दरम्यान, भाजपनं निवडून येण्याची दाट शक्यता असलेल्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. याशिवाय मतदारसंघातील स्पर्धेत असलेल्या उमेदवारांची एक यादी तयार केली आहे. या दोन्ही याद्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर अंतिम यादीवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. याशिवाय युतीच्या जागावाटपाबाबतही निर्णय होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल भाजपसोबतच्या युतीवर भाष्य केलं. होणारच आहे. त्याबाबत आमचा निर्णय आधीच झाला आहे. सध्या केवळ जागावाटपावर चर्चा सुरू आहे, असं यांनी स्पष्ट केलं होतं.