दाऊदच्या साथीदाराशी प्रफुल्ल पटेल यांची डील? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 13, 2019

दाऊदच्या साथीदाराशी प्रफुल्ल पटेल यांची डील?

https://ift.tt/2M9XCWB
विजय व्ही. सिंह, मुंबई : माजी नागरी विमान वाहतूकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आता ईडीच्या रडारवर आलेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका साथीदाराशी प्रफुल्ल पटेल यांनी आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्या प्रकरणी ईडीने तपास सुरू केलाय. 'मिर्ची' नावाने कुख्यात दिवंगत इकबाल मेमन याच्याशी पटेल यांच्या कुटुंबाच्या कंपनीने आर्थिक व्यवहार केला होता. पटेल कुटुंबाची मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि 'मिर्ची'मध्ये झालेल्या कायदेशीर कराराचा तपास ईडीकडून करण्यात येतोय. पटेल कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीकडून 'मिर्ची' ला एक प्लॉट देण्यात आला होता. हा प्लॉट वरळीतील नेहरू तारांगणच्या समोर प्राइम लोकेशनला आहे. याच प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली रहिवासी आणि व्यावसायिक इमारत बांधली. या इमारतीचे नाव 'सीजे हाउस' असे आहे. ११ ठिकाणी ईडीचे छापे, महत्त्वाची कागदपत्रे हाती या प्रकरणी गेल्या दोन आठवड्यांत मुंबईपासून ते बेंगळुरूपर्यंत ११ ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. यात छाप्यांमध्ये मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला आहे. डिजिटल पुरावे, ईमेल आणि कागदपत्रे जप्त केल्यानंतर ईडीने १८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. इकबाल मेमम म्हणजे 'मिर्ची'ची पत्नी हजरा मेमन यांच्या नावे असलेला प्लॉट पटेल कुटुंबाच्या कंपनीच्या नावे करण्यात आला, यासंबंधिची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत. प्लॉटच्या बदल्यात 'मिर्ची'च्या पत्नीला २०० कोटींचे दोन मजले प्लॉट रिडेव्हलपमेंटशी संबंधित दोन्ही पक्षांमध्ये करार झाला. २००६-०७मध्ये झालेल्या या डीलनुसार सीजे हाउस इमारतीमधील दोन मजले मेमन कुटुंबाला देण्यात आले. इमारतीच्या या दोन मजल्यांची किंमत २०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे भागधारक आहेत. यामुळे चौकशीसाठी पटेल कुटुंबीयांना बोलावलं जाऊ शकतं, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. 'मिर्ची'च्या पत्नीला का दिले दोन मजले? इमारतीचे दोन मजले मेमन कुटुंबाला का दिले? तसंच या डील शिवाय इतर कुठले आर्थिक व्यवहार झाले का? असे प्रश्न चौकशीत केले जातील, असं ईडीतील सूत्राने सांगितलं.