
मुंबई: मी देशातील परिस्थिती बाबत कधीही निराश आणि हताश नव्हतो आणि भविष्यातही नसेल असे प्रतिपादन अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी केले. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना नसरुद्दीन शहा यांनी व्यक्तव्य केले. याआधी देशात होणाऱ्या मॉब लिचिंग, असहिष्णूतेच्या घटनांवर नसरुद्दीन शहा यांनी आपले परखड मत व्यक्त केले होते. त्यावेळी त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. आज सकाळी नसरुद्दीन शहा आणि रत्ना पाठक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीला मतदार यादीत नाव सापडत नसल्यामुळे त्यांना यादीत आपले नाव शोधावे लागले. मतदान केल्यानंतर शहा यांनी सांगितले की, आपण देशातील परिस्थितीमुळे केव्हा निराश नव्हतो. आजही निराश नसून भविष्यातही निराश होणार नसल्याचे सांगितले. मला देशातील युवकांपासून खूप अपेक्षा आहेत. युवक देशाचे भविष्य असून नाउमेद करणार नसल्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. देशातील सामाजिक-राजकीय परिस्थितीवर शहा यांनी अनेकदा परखड मते व्यक्त केली आहेत. अनेकदा सोशल मीडियावर त्यांना लक्ष्यही करण्यात आले आहे. दरम्यान, काही महिनेआधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. आजच्या घडीला देशात द्वेष आणि क्रूरतेनं उच्छाद मांडला आहे आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या घरी छापेमारी करून त्यांची बँक खाती गोठवून आवाज दाबला जात आहे, असा आरोप त्यांनी केला होता. जुलै महिन्यात डीवायएफआय या युवक संघटनेने आयोजित केलेल्या झुंडबळी पीडितांच्या परिषदेत त्यांनी आपले मत व्यक्त कपहलू खान आणि कलम ३७० वर नसीरुद्दीन शहांचं मौनरताना पीडितांच्या वेदना ऐकून हेलावून गेलो असल्याचे म्हटले होते. मागे मी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून माझ्यावर टीका झाली. मला गद्दार म्हटलं गेलं. देश सोडून जाण्यास सांगितलं गेलं. पण माझ्यावर जी टीका केली गेली, मला अपमानित केलं गेलं, त्यापेक्षा या लोकांनी खूपच सहन केलंय. त्याची कल्पना करणंही शक्य नाही, असंही शहा यांनी त्या परिषदेत म्हटले होते.