गाय चारा नाही मासांहार खातात; मंत्र्याचे तर्कट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 22, 2019

गाय चारा नाही मासांहार खातात; मंत्र्याचे तर्कट

https://ift.tt/2o7ZPZJ
पणजी: गाय हा शाकाहारी वर्गात मोडणारा प्राणी आहे. गाय हा मासांहारी प्राणी आहे असे कोणी म्हटले तर लोकं हसण्यावारी नेतील. मात्र, गाई मासांहारी झाल्या आहेत असे खुद्द गोव्याचे मंत्री मायकल लोबो यांनी म्हटले आहे. मंत्र्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. गोवा सरकाचे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले की, उत्तर गोव्यातील कलंगुट आणि आरपोरा या भागात बेवारसपणे फिरणाऱ्या गाई, बैल आणि वासरे आहेत ते मासांहारी झाल्या आहेत. या परिसरातील हॉटेलजवळ, घरांजवळ असणाऱ्या कचऱ्यात खाद्यपदार्थात मासांहारी अन्न असते. हे खाद्यान्न गाई, बैल खातात. याआधी गाई आणि वासरू चारा चरण्यासाठी डोंगराळ भागात, मैदानी प्रदेशात जात असे. आता मात्र तिथे जाण्याऐवजी हॉटेल, घर परिसरातील कचऱ्यात आढळणाऱ्या जेवणावर आता गाई, वासरं पोट भरत आहेत. गोशाळेत उपचार सुरू बेवारसपणे फिरणाऱ्या गाई, वासरांना गोशाळेत दाखल करण्यात येत असल्याचे लोबो यांनी सांगितले. यापुढे जन्माला येणाऱ्या गाई या आरोग्याच्यादृष्टीने चांगल्या हव्यात. त्यामुळे गायींना गोशाळेत दाखल करण्यात आले असल्याची माहिती लोबो यांनी दिली. या गोशाळेत आहार सवयी बदल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची गोशाळेत योग्य प्रकारे काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यावर बेवारपणे फिरणाऱ्या गोवंशाना गोशाळेत धाडण्याचा घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, गोव्यातील रस्त्यांवर बेवारसपणे फिरणाऱ्या प्राण्यांच्या मुद्यावर हायकोर्टाने गोवा सरकारला फटकारले होते. मासुपा पालिकेला बेवारस प्राण्यांवर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. गाय चारा नाही खात गोवंश प्राणी आता चारा खात नसल्याचा दावा लोबो यांनी केला. त्यांची पचनसंस्था आता मासांहारी पदार्थ खाण्यायोगे झाली असल्याचे त्यांनी सांगितले. गोशाळेत सध्या पशू डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्यांची पचनसंस्था पुन्हा पूर्वीसारखे करण्यात येत आहेत. त्यामुळे काही दिवसांतच त्या पुन्हा एकदा शाकाहारी होतील. सध्या गायींना चारा खाण्यास दिला जात आहे. मात्र, गाई चारा खात नसल्याचे त्यांनी सांगितले.