
मुंबई: सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर १००० रुपयांच्या नवीन नोटांचे फोटो शेअर केले जात आहेL. या फोटोंमध्ये दिसणाऱ्या नवीन नोटा आरबीआयकडून जारी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दावा:आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या या नवीन नोटा वर्ष २०२०मध्ये वापरात येणार असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. काय आहे सत्य?सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असलेल्या या फोटोंमधील नोटा आरबीआयकडून जारी करण्यात आल्या नसल्याचं समोर आलं आहे. ही केवळ एक अफवा असून कोणत्याही संकेस्थळावर याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. वर्ष २०१७मध्ये देखील हिच अफवा पसरवण्यात आली होती. तेव्हा तत्कालीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी १००० रुपयांच्या नवीन नोटा छापण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं ट्विट करून सांगितलं होतं. यावरून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या १००० रुपयांच्या नोटांचे मेसेज आणि फोटो खोटे असल्याचं समोर आलं आहे.