वर्षभर मोबाइल वापरला नाही; जिंकले ७१ लाख ₹ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 22, 2019

वर्षभर मोबाइल वापरला नाही; जिंकले ७१ लाख ₹

https://ift.tt/2W0hD5x
न्यूयॉर्क: २४ तास आपल्यासोबत असणारा आपला मित्र म्हणजे आपला 'स्मार्टफोन'. केवळ संपर्कात राहण्यासाठी फोनचा वापर होतोय असे दिवस गेले. वेळ पाहायला, गाणी ऐकायला, व्हिडिओ शुट करायला अनेकदा ऑफिसचे मेल करायला या सर्वांसाठी आपण आपला स्मार्टफोन वापरतो. इतकंच काय तर हवामानाचा अंदाज घेण्यासाठीही आजकाल आपण फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर चेक करतो. याचा अर्थ तुम्ही स्मार्टफोनच्या आहारी गेला आहात असा होतो. सतत आपल्या स्मार्टफोनवर नोटिफिकेशन्स, अॅप्समधील कलर स्कीम बदलणे, शेअर केलेल्या फोटोला मिळालेल्या लाइक्स, फॉलोअर्स, मोबाइल गेम्समध्ये किती ट्रॉफी मिळाल्या हे पाहणे...ही सर्व स्मार्टफोन अॅडिक्ट झाल्याची लक्षणे आहेत. स्मार्टफोनपासून दूर राहणं आपल्याला शक्य वाटत नाही. परंतू न्यूयॉर्क मधल्या एका तरुणीनं वर्षभर स्मार्टफोन न वापरण्याचं चॅलेंज स्विकारलं आणि जिंकलंही. न्यूयॉर्कमधील एका कंपनीनं वर्षभरापूर्वी हे चॅलेंज दिलं होते. इलाना मुगडेन (Elana Mugdan) या तरुणीनं हे चॅलेंज जिंकलं असून लवकरच तिला बक्षिसाचे ७१ लाख रुपये मिळणार आहेत. Vitaminwater या पेय पदार्थ बनवणाऱ्या एका कंपनी तर्फे या अनोख्या चॅलेंजचे आयोजन केलं होतं. 'स्क्रोल फॉर द इयर' ( Scroll Free for a Year)असं या चॅलेंजचं नाव होतं. जवळपास एक लाख लोकांनी या चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज केले होते. या सर्व अर्जांमध्ये केवळ २९ वर्षीय इलाना हिला हे चॅलेंज जिंकण्याची संधी मिळाली. कंपनीनं दिलेल्या चॅलेंजनुसार, तिला वर्षभरासाठी स्मार्टफोनचा वापर न करता राहावे लागणार होते. या बदल्यात तिला एक लाख डॉलर (म्हणजेच ७० ते ७२ लाख रुपये) बक्षीस म्हणून देण्यात येतील असं सांगण्यात आलं.या तरुणीनं हे चॅलेंज स्विकारलंही आणि जिंकलंही. तिला वर्षभरासाठी एक साधा फोन वापरण्यासाठी देण्यात आला होता. बक्षिसाची रक्क देण्यापूर्वी या तरुणीची लाय-डिटेक्टर ही चाचणी करण्यात येणार आहे. तिनं खरंच हे चॅलेंज पूर्ण केलं की नाही हे तिला या चाचणीद्वारे सिद्ध करावं लागेल. नंतर तिला तिच्या बक्षिचसाठी पूर्ण रक्कम देण्यात येणार आहे.